Video - लोणावळ्याजवळ भंगार गोदामाला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 17:47 IST2018-12-19T17:10:16+5:302018-12-19T17:47:33+5:30
लोणावळ्याजवळील वरसोली टोलनाका येथे मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या भंगार दुकानाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.

Video - लोणावळ्याजवळ भंगार गोदामाला भीषण आग
ठळक मुद्देलोणावळ्याजवळील वरसोली टोलनाका येथे मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या भंगार दुकानाला भीषण आग लागली आहे.दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. भंगार गोदामासह परिसरातील दुकाने जळून खाक झाली आहेत.
लोणावळा - लोणावळ्याजवळील वरसोली टोलनाका येथे मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या भंगार दुकानाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी (19 डिसेंबर) दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे.
आग लागल्याने भंगार गोदामासह परिसरातील दुकाने जळून खाक झाली आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणात आगीचे लोट व धुरांचे डोंब हवेत गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच आयआरबी व लोणावळा नगरपरिषद यांच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आग पाहण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे.