Video: अंगावर काटा आणणारा दौंडमधील विजेचा व्हिडीओ पाहिला आहे का?; शहरात पावसाचे रौद्र रूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 11:52 IST2021-10-07T11:50:55+5:302021-10-07T11:52:20+5:30

पावसादरम्यान अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट होत होता. परिसरात अनेक ठिकाणी विजा चमकत होत्या. एक देश-दुसऱ्या देशांवर जशा मिसाईल सोडतो तशा प्रकारचा काहीसा विजांच्या नैसर्गिक हल्ल्याचा थरारक अनुभव दौंड शहरात पावसादरम्यान नागरिकांना आला

video of lightning daund heavy rain in city | Video: अंगावर काटा आणणारा दौंडमधील विजेचा व्हिडीओ पाहिला आहे का?; शहरात पावसाचे रौद्र रूप

Video: अंगावर काटा आणणारा दौंडमधील विजेचा व्हिडीओ पाहिला आहे का?; शहरात पावसाचे रौद्र रूप

ठळक मुद्देदौंड शहरातील विविध भागांमध्ये विजांचा कडकडाटासह पाऊस झालाकाल दौंड परिसरात पावसाने रौद्र रूप घेतल्याचे दिसले होते

दौंड (पुणे): काल दौंड परिसरात पावसाने रौद्र रूप घेतल्याचे दिसले होते. दौंड शहर आणि परिसरामध्ये काल झालेल्या मुसळधार पावसानं पिके धुवून निघाली आहेत. विजेचा कडकडाटासह काल झालेल्या पावसाने स्थानिकांना हादरवून ठेवले आहे. दौंड शहरासह तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याचे पाहायला मिळाले.

पावसादरम्यान अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट होत होता. परिसरात अनेक ठिकाणी विजा चमकत होत्या. एक देश-दुसऱ्या देशांवर जशा मिसाईल सोडतो तशा प्रकारचा काहीसा विजांच्या नैसर्गिक हल्ल्याचा थरारक अनुभव दौंड शहरात पावसादरम्यान नागरिकांना आला. काल दुपारपासूनच दौंड शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर ढग दाटून आले अचानक विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली.

दौंड शहरातील विविध भागांमध्ये विजांचा कडकडाट होता. पावसाचा जोर वाढत असतानाच शहरातील लिंगाळी रोडवर असणाऱ्या बर्फ फॅक्टरी बिल्डिंगवर मिसाईल हल्ला व्हावा तशी कडकडाटात वीज आदळली. याचा व्हिडीओही सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. ही वीज एवढ्या प्रचंड वेगाने आदळली की आसपासच्या नागरिकांत भीतीचे वातवरण पसरले होते.

Web Title: video of lightning daund heavy rain in city