Video : The horseman and the horse were also injured while controlling the overturned buggy | Video : उधळलेली बग्गी नियंत्रित करताना घोडामालक अन् घोडाही जखमी
Video : उधळलेली बग्गी नियंत्रित करताना घोडामालक अन् घोडाही जखमी

पुणे : येरवडा परिसरात कोरेगाव पार्क कल्याणीनगर रस्त्यावर मध्यरात्री उधळलेल्या घोड्याची बग्गी नियंत्रित करण्याच्या प्रयत्नात अपघात झाला़ त्यात घोडा मालक व घोडा जखमी झाले आहेत.

ही घटना कोरेगाव पार्क कल्याणीनगर रस्त्यावर मध्यरात्री घडली. बग्गीला दोन घोडे जुंपलेले होते. बग्गीत कोणी नसताना अचानक घोड्यांनी धावायला सुरुवात केली. ते पाळून घोडामालक एका दुचाकीवरुन त्यांच्या मागोमाग जाऊ लागला. त्यांनी बग्गीजवळ जाऊन घोड्याला थांबविण्यासाठी त्याचा लगाम पकडण्याचा प्रयत्न केला. त्यात घोडाचा पाय घसरल्याने तो खाली पडला. त्यामुळे दुचाकीमागे बसलेला मालकही खाली पडला व त्यांच्या अंगावरुन बग्गी गेली. या घटनेत घोडा आणि घोडामालक जखमी झाले आहेत.

Web Title: Video : The horseman and the horse were also injured while controlling the overturned buggy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.