शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

उकाड्यावर शिडकावा! विदर्भ, मराठवाड्यात पुढील पाच दिवस वादळी पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 5:23 AM

चढला पारा, बरसल्या अवकाळी धारा 

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : अरबी समुद्रातील चक्रीवादळाच्या स्थितीमुळे गुजरातकडून कोकण तसेच मध्य महाराष्ट्रात आर्द्रतायुक्त उष्ण वारे येत आहेत. बंगालच्या उपसागरावरून छत्तीसगड तेलंगणामार्गे विदर्भातही आर्द्रतायुक्त उष्ण वारे येत असल्याने शुक्रवारी व शनिवारी राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. पुढील दोन दिवस मराठवाड्यात काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा असतानाच बुधवारी काही भागात पाऊस झाला. बीडमध्ये वीज कोसळून चार जनावरे दगावली. हिंगोलीतही पावसाने हजेरी लावली. 

कोकण व विदर्भात येत असलेल्या आर्द्रतायुक्त उष्ण वाऱ्यांमुळे दिवसा कमाल तापमानात वाढ झाली आहे. तर दुपारनंतर रात्री उशिरापर्यंत ढगाळ वातावरणामुळे आर्द्रता वाढली आहे. परिणामी, पुढील पाच ते सात दिवस हलक्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. - डॉ. अनुपम कश्यपी, हवामानतज्ज्ञ

रात्री उशिरापर्यंत उकाडावातावरणातील खालच्या स्तरातील द्रोणिका रेषा सध्या दक्षिण विदर्भापासून दक्षिण कोकणापर्यंत गेली असल्याने कोकणात तसेच मुंबईत कमाल तापमानात वाढ झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आले. तसेच, आर्द्रतायुक्त उष्ण वाऱ्यांमुळे पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे रात्री उशिरापर्यंत आर्द्रता वाढल्याने उकाडा वाढला आहे. 

सांगली, कोल्हापूरमध्ये गारपीटीने झोडपलेकोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे बुधवारी सायंकाळी गारपीट झाली.  सातारा जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. तर, सांगली जिल्ह्याला गारपिटीने झोडपले. 

कमाल तापमान  ४३ अंशांवर : मालेगाव, जेऊर (जि. सोलापूर), बीड ४२ अंशांवर : जळगाव, सोलापूर, वाशिम, अकोला  ४१ अंशांवर : परभणी, नांदेड ४० अंशांवर : चिखलठाणा (छत्रपती संभाजीनगर), जालना, सातारा, नाशिक, बारामती, धाराशिव

काय आहे अंदाज?गुरुवारी छत्रपती संभाजीनगर, बीडमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे तर नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. शुक्रवारी व शनिवारी विदर्भात वादळी वारे तसेच विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसMarathwadaमराठवाडा