शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

घरे अतिक्रमणांच्या कचाट्यात, वसई विरार महानगरातील वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 03:03 IST

वसई विरार शहर महानगपालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात इमारतींचे बांधकाम राखीव असलेल्या भूखंडावर अनिधकृतपणे बिनधास्त केले गेल्याचे समोर आले आहे.

नालासोपारा - वसई विरार शहर महानगपालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात इमारतींचे बांधकाम राखीव असलेल्या भूखंडावर अनिधकृतपणे बिनधास्त केले गेल्याचे समोर आले आहे.मिळालेल्या आकडेवारीनुसार वसई विभागामध्ये ५०.६९ टक्के, नालासोपारा विभागामध्ये ७७.३७ टक्के तर विरार विभागामध्ये ३०.४५ टक्के राखीव भूखंडांवर अनधिकृत इमारती किंवा कब्जा करण्यात आलेला आहे. या आरक्षित भूखंडावर शाळा, क्रीडांगण, उद्यान, पोलीस स्टेशन, डंपिंग ग्राऊंड, बफर झोन ठेवण्यात आलेले आहे.वसई विरार मनपाच्या ९ प्रभागातील राखीव ठेवण्यात आलेल्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाल्याचे समोर निदर्शनास आले आहे.ही सर्व माहिती भाजपाचे नालासोपारा शहर उपाध्यक्ष राकेश सिंह यांनी माहिती अधिकारात मागवली आहे. लोकांनी मोठं मोठी स्वप्ने बघून हक्काची घरे विकत घेतली आहेत मात्र त्यांना लागणाऱ्या सुविधा या कायद्याच्या कचाट्यात सापडल्या आहेत.मिळालेल्या माहितीनुसार मनपाच्या प्रभाग ‘बी’ मध्ये सर्वाधिक म्हणजेच ९०.६७ टक्के राखीव भूखंडावर अनधिकृत बांधकामे झालेली आहेत तर प्रभाग ‘सी’ मध्ये सगळ्यात कमी म्हणजेच २९.८९ टक्के राखीव भूखंडावर अनधिकृत बांधकामे झालेली आहेत. मनपाच्या नऊ प्रभागात अनुक्र मे ‘ए’ मध्ये ३०.८९ टक्के, प्रभाग बी मध्ये ९०.६७ टक्के, प्रभाग सी मध्ये २९.८९ टक्के, प्रभाग डी मध्ये ८७.९६ टक्के, प्रभाग ई मध्ये ६५.९६ टक्के, प्रभाग एफ मध्ये ८७.५ टक्के, प्रभाग जी मध्ये ४६.४७ टक्के, प्रभाग एच मध्ये ६३.७२ टक्के आणि प्रभाग आई मध्ये ३५.७९ टक्के राखीव भूखंडावर अनिधकृत बांधकामे झालेली आहेत. तर सध्या ५ टक्के राखीव भूखंडावर अनिधकृत बांधकामे सुरू आहे. वसई विरार मनपाच्या हद्दीत भूमाफिया कोणालाही न जुमानता, मनपाच्या अधिकाºयांशी साटेलोटे करून बिनधास्त अनिधकृत बांधकामे करतात असे अनेक ठिकाणी निदर्शनास आले आहे.काही अनधिकृत बांधकामे नाल्यावर किंवा नाले बुजवून सुद्धा केलेली आहे. राखीव भूखंडावरील अनधिकृत बांधकामामुळे पोलीस स्टेशन व चौक्या, वसई विरार मधील आरटीओ कार्यालय आणि बस डेपो अशा प्रशासकीय कार्यालयांना जागेकरिता अच्छे दिनाची वाट पाहावी लागणार आहे. मनपाच्या सर्व प्रभागातील हद्दीमधील ५१ मार्केट झोन देखील या अतिक्रमणांपासून वाचलेले नाहीत. मनपा आयुक्तांनी वाढती लोकसंख्या आणि प्रशासकीय अधिकाºयाची कमतरता असल्याचे कारण देत आपला पल्ला झाडला आहे तर विविध प्रभागात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर दररोज कारवाई केली जात असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले आहे.राखीव भूखंडची माहिती देणारे बोर्ड धूळ खातायेतवसई विरार मनपाच्या प्रभागात भ्रष्टाचार इतका वाढला आहे की, राखीव भूखंडाच्या बाबत माहिती सांगण्यासाठी बनविण्यात आलेले बोर्ड प्रभागाच्या वॉर्ड आॅफिसच्या परिसरात गंजून भंगार स्थितीत आहेत.राखीव भूखंडाकडे मनपाने लक्ष न देता जाणीवपूर्वक काणाडोळा केला तर अधिकाºयांनी आर्थिक साटेलोटे करून मदत केल्याने हे भूखंड भूमाफियांच्या घशात गेल्याचा आरोप होतो आहे. तर दुसरीकडे राखीव भूखंडावर भूमाफियांनीकब्जा करून अनधिकृत इमारती उभ्या केल्याने खेळाची मैदाने, गार्डन, हॉस्पिटल, मार्केट, शाळा हे कागदावरच राहिलेआहे.राखीव भूखंडावर अनधिकृत बांधकामे सुरू असतांनाच मनपाने कारवाई करण्याची हिम्मत दाखवली असती तर खेळण्यासाठी मैदाने, शाळा, हॉस्पिटल, मार्केट यांचे भूखंड माफियांच्या घशात गेले नसते.- राकेश सिंग, उपाध्यक्ष, नालासोपारा शहर, भाजपाकोणत्या राखीव भूखंडावर अनधिकृत बांधकामे आहेत ते दाखवून द्या. त्यांच्यावर रोज कारवाई करून ती तोडली जात आहेत.- सतिश लोखंडे, आयुक्त, वसई विरार महानगरपालिका

टॅग्स :Vasai Virarवसई विरारPuneपुणे