शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
2
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
3
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
4
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
5
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
6
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
7
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
8
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
9
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
10
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
11
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
12
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
13
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
14
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
15
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
16
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
17
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन
18
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
19
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
20
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 

घरगुती कचऱ्यापासून गांडूळखत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:28 AM

मांदेडे ग्रामपंचायत व कर्वे समाजसेवा संस्थेचा संयुक्त उपक्रम

पौड : रस्ते, वीज, पाणी यांसारख्या मूलभूत सोयी ग्रामपंचायतीच्या माध्यमाने उपलब्ध करून देण्याबरोबरच विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमाने विविध सामाजिक उपक्रम राबवून गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास घेतलेल्या मुळशी तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील मांदेडे ग्रापंचायतीने ‘ग्रामस्वच्छता’ या विषयातही एक पाऊल पुढे टाकले आहे. मांदेडे ग्रामपंचायत मुळशी तालुक्यातील एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते.

या ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून तसेच कर्वे समाजसेवा संस्था व एस.एल.के. ग्लोबल प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील प्रत्येक घरातील कचºयापासून खतनिर्मिती हा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती सरपंच अरुणा वीर यांनी दिली.या उपक्रमाकरिता ऋषी आगरवाल, दीप्ती कांबळे, चयन पारधी, गुरुनाथ स्वामी यांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमाकरिता उपसरपंच संजय वीर, सदस्य बाळासाहेब साळुंखे, किसन बोडखे, अमृता वीर, पारूबाई कुडले, चंदाबाई धुमाळ यांचे सहकार्य लाभले.मांदेडे गावात २0१७ पासून ग्रामविकासाचे विविध उपक्रम राबविले जातात. यामध्ये शेती, आरोग्य, शिक्षण, पाणी व्यवस्थापन, महिला सबलीकरण त्याचबरोबर आता कचरा व्यवस्थापन या विषयातही काम सुरु केले आहे. चालू वर्षी प्रत्येक घरासमोर कचरा व्यवस्थापन यंत्रणा बसविली आहे. त्यामध्ये घरगुती कचºयाचे विघटन करून गांडूळखताची निर्मिती केली जाते. कर्वे समाज सेवा संस्था व इनोरा बायोकेमिकल बावधन यांच्यामार्फत ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. यामुळे कचरामुक्त गाव या संकल्पनेला गती चांगली गती मिळणार आहे.- अरुणा वीर, सरपंच 

टॅग्स :Puneपुणे