वानवडी येथे स्थानिक गुंडांच्या टोळक्याचा तुफान राडा; आठ ते दहा वाहनांची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 11:37 IST2021-02-13T11:37:22+5:302021-02-13T11:37:45+5:30

मागील आठ दिवसात दुसऱ्यांदा तोडफोडीची गंभीर घटना परिसरात घडली आहे.

vehicles broken up by criminal gang in the Wanwadi | वानवडी येथे स्थानिक गुंडांच्या टोळक्याचा तुफान राडा; आठ ते दहा वाहनांची तोडफोड

वानवडी येथे स्थानिक गुंडांच्या टोळक्याचा तुफान राडा; आठ ते दहा वाहनांची तोडफोड

पुणे: वानवडी येथील तरवडे वस्तीवर स्थानिक गुंडांच्या टोळक्याने तुफान राडा केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आठ ते दहा वाहनांची टोळक्याकडून तोडफोड केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.१२) मध्यरात्री घडली. दुचाकीवरुन आलेल्या टोळक्याने परिसरातील नागरिकांना धमकावत तोडफोड करत दहशत निर्माण केली.  

मिळालेल्या माहितीनुसार,गुंडांच्या टोळक्याने शुक्रवारी मध्यरात्री रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या रिक्षा, दुचाकी फोडत दहशत निर्माण केली आहे. मागील आठ दिवसात दुसऱ्यांदा तोडफोडीची गंभीर घटना परिसरात घडली आहे. या घटनेत रिक्षा दुचाकीसह अनेक गाड्यांची तोडफोड झाल्यामुळे प्रचंड नुकसान झाल्याची बाब समोर आली आहे. स्थानिक टोळक्यांकडून होत असलेल्या तोडफोडीच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे पोलिसांकडूनगुन्हेगारी प्रवृत्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. 

Web Title: vehicles broken up by criminal gang in the Wanwadi