पुण्यातील वाहनविक्रीवर मंदीचे सावट : दोन वर्षातला विक्रीचा नीच्चांक 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 07:00 AM2019-08-21T07:00:00+5:302019-08-21T07:00:04+5:30

वाढता उत्पादन खर्च, जीएसटीचे चढे दर, केंद्र सरकारची इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याची भूमिका, अशा विविध कारणांमुळे देशातील वाहन विक्री घटली आहे

Vehicle sales sector slows down in Pune: low sales in two years | पुण्यातील वाहनविक्रीवर मंदीचे सावट : दोन वर्षातला विक्रीचा नीच्चांक 

पुण्यातील वाहनविक्रीवर मंदीचे सावट : दोन वर्षातला विक्रीचा नीच्चांक 

googlenewsNext
ठळक मुद्देआरटीओकडे होत असलेल्या वाहन नोंदणीमध्ये मागील दोन वर्ष सातत्याने घटदुचाकी विक्रीला सर्वाधिक फटका

- राजानंद मोरे
पुणे : देशभर वाहन उद्योगात असलेली मंदी पुण्यातही जाणवत आहेत. पुण्यातील वाहन विक्री मागील वर्षाच्या नीचांकावर पोहचली आहे. प्रामुख्याने दुचाकी व कारच्या विक्रीत घट झाल्याचे दिसून येते. एप्रिल ते जुलै या चार महिन्यांचा विचार केल्यास २०१७ मध्ये अनुक्रमे ६९ हजार १८ हजार ६०० गाड्यांची विक्री झाली होती. ही विक्री २०१९ मध्ये अनुक्रमे १६ हजार व चार हजाराने कमी झाली आहे. मागील वषार्पासूनच वाहन विक्री मंदावल्याचे आकडेवारीवरून दिसते. 
वाढता उत्पादन खर्च, जीएसटीचे चढे दर, केंद्र सरकारची इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याची ठाम भुमिका, घटती मागणी अशा विविध कारणांमुळे देशातील वाहन विक्री घटली आहे. पुण्यातील वाहन विक्रीवरही मंदीचे सावट घोंघावत आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालया (आरटीओ)कडे होत असलेल्या वाहन नोंदणीमध्ये मागील दोन वर्ष सातत्याने घट होत आहे. आरटीओकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, पुण्यात (एमएच १२) आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये सुमारे २ लाख ९१ हजार तर २०१८-१९ मध्ये २ लाख ६१ हजार वाहनांची नोंदणी झाली. याचाअर्थ मागील वर्षी सुमारे ३० हजारांनी वाहन विक्रीत घट झाली. ही घट आर्थिक वर्ष २०१९-२० मध्येही कायम राहणार असल्याचे चित्र आहे. एप्रिल ते जुलै या कालावधीत ७६ हजार ७५१ वाहनविक्री झाली आहे.
मागील तीन वर्षांचा विचार केल्यास मे महिन्यात २०१७ मध्ये २७ हजार ६०० वाहनांची विक्री झाली होती. २०१९ पर्यंत त्यामध्ये ७ हजारांनी घट झाली. हीच स्थिती जून महिन्यातही कायम राहिली आहे. जुनमध्ये २०१७ मध्ये २५ हजार ६२२ वाहने नोंदविली गेली होती. हा आकडा २०१९ मध्ये १६ हजारापर्यंत खाली आला आहे. जुलै महिन्यात २०१८ मध्ये २३ हजार तर २०१९ मध्ये १८ हजार वाहनांची नोंद झाली. सलग तिसºया वर्षी वाहन विक्रीमध्ये घट झाल्याचे यावरून स्पष्ट होते.  
--------
पुण्यातील तीन वर्षांची वाहन विक्री -
वर्ष व महिना    २०१७        २०१८        २०१९
एप्रिल        २१,९०९        २२,६३९        २१,७६५
मे        २७,६००        २२,५१२        २०,५७६
जून        २५,६२२        २०,९४२        १६,०३०
जुलै        १९,२१६        २३,३२६        १८,३८०
-----------------------------------
वाहन विक्री

वाहन प्रकारनिहाय विक्रीत झालेली घट
एप्रिल ते जुलै        दुचाकी        कार        
२०१७            ६९,१४५        १८,६०४        
२०१८            ५९,५३९        १५,२९४
२०१९            ५३,५१८        १४,७४५
-----------
एप्रिल १७ ते मार्च १८ - २,९१,११७
एप्रिल १८ ते मार्च १९ - २,६१,४१०
एप्रिल १९ ते जुलै १९ - ७६,७५१
-----------
दुचाकी विक्रीला सर्वाधिक फटका
वाहन विक्रीमध्ये सर्वाधिक फटका दुचाकी उद्योगाला बसल्याचे आकडेवारीवरून दिसते. सलग तीन वर्षात मोठी घट झाल्याचे दिसते. पुण्यात (एमएच १२) एप्रिल ते जुलै या महिन्यात २०१७ मध्ये सुमारे ६९ हजार दुचाकींना ग्राहकांनी पसंती दिली होती. तर कारची विक्री १८ हजार ६०० एवढी होती. २०१८ मध्ये ही विक्री अनुक्रमे ५९ हजार ५०० व १५ हजार ३०० पर्यंत खाली आली. २०१९ मध्येही ही घट कायम राहिली असून विक्रीचा आकडा अनुक्रमे ५३ हजार ५०० व १४ हजार ७०० पर्यंत मयार्दीत राहिली आहे. पुण्यात २०१८-१९ मध्ये विक्री झालेल्या सुमारे २ लाख ६१ हजार वाहनांपैकी १ लाख ७६ हजार दुचाकींची संख्या आहे. त्यामुळे दुचाकीची विक्री सर्वाधिक रोडावल्याचे ठळकपणे दिसून येते.


 

Web Title: Vehicle sales sector slows down in Pune: low sales in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.