पुणे : मार्केटयार्डातील फळे आणि कांदा व बटाटा विभागात सोमवारी (दि.6) रोजी सुमारे ४१६ ट्रक शेतीमालाची आवक झाली. यामुळे सध्या पुणेकरांना रास्त दरामध्ये भाजीपाला, फळे आणि कांदा-बटाटे उपलब्ध होणार आहेत.कोरोनामुळे बाजार समितीकडून उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयाडार्तील कामकाज दिवसाआड सुरू ठेवण्यात येत आहे.भाजीपाला, फळे आणि कांदा-बटाटा विभागातील आवक दिवसाआड होत असून, त्यामुळे बाजार आवारात होणारी गर्दी कमी होत आहे. खरेदीदार, आडते, हमाल, कामगार अशा बाजारघटकांमध्ये विशिष्ट अंतर राखण्यात येत आहे.बाजार आवारात प्रवेशद्वारात निजंर्तुकीकरण यंत्रणा बसविण्यात आली आहे.सोमवारी मार्केटयाडार्तील फळे तसेच कांदा-बटाटा विभागाचे काम सुरू राहिले.मार्केटयाडार्तील मुख्य बाजारात सोमवारी कांदा-बटाट्याच्या १६६ गाड्यांची आवक झाली.एकुण मिळून ७ हजार ८०० क्विंटल कांदा-बटाट्याची आवक झाली. २५० गाड्यांमधून फळांची आवक झाली.बाजारात एकुण मिळून ७ हजार ५०० क्विंटल आवक झाली. मोशीतील बाजारात १४१ गाड्या आवक झाली असून या बाजारात एकुण मिळून ३ हजार ५०० क्ंिवटल आवक झाली. दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खडकी आणि मांजरी येथील उपबाजारात खरेदीसाठी होणारी गदीर्मुळे बाजार समितीच्या प्रशासनाकडून या दोन्ही उपबाजारांचे कामकाज सोमवारी बंद ठेवले. करोनामुळे खरेदी-विक्री व्यवहारात ठराविक अंतर राखण्यासाठी तूर्तास दोन्ही बाजारांचे कामकाज बंद ठेवण्यात आले.या बाजारातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली.
पुणेकरांना रास्त दरामध्ये भाजीपाला, फळे उपलब्ध होणार; मार्केटयार्ड बाजारात ४१६ ट्रक शेतीमालाची आवक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 17:21 IST
खरेदीदार, आडते, हमाल, कामगार अशा बाजारघटकांमध्ये विशिष्ट अंतर
पुणेकरांना रास्त दरामध्ये भाजीपाला, फळे उपलब्ध होणार; मार्केटयार्ड बाजारात ४१६ ट्रक शेतीमालाची आवक
ठळक मुद्देबाजार आवारात प्रवेशद्वारात निजंर्तुकीकरण यंत्रणा