'कोणी प्रेम करो ना करो, आम्ही प्रेम...' i Love Raj; वसंत मोरे पुन्हा चर्चेत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 16:33 IST2022-10-13T16:32:49+5:302022-10-13T16:33:14+5:30
मनसेतील सर्वाधिक चर्चेत असणारा चेहरा म्हणून वसंत मोरेंकडे पाहिले जाते

'कोणी प्रेम करो ना करो, आम्ही प्रेम...' i Love Raj; वसंत मोरे पुन्हा चर्चेत...
पुणे : मनसेचे वसंत मोरे हे नाव गेल्या काही महिन्यांपासून चांगलंच चर्चेत आहे. आपल्या हटके स्टाईल कामाने ते सोशल मीडियावर हिरो ठरले आहेत. पुणे मनसेतील सर्वाधिक चर्चेत असणारा चेहरा म्हणून वसंत मोरेंकडे पाहिले जाते. याच वसंत मोरेंच्या फेसबुक पोस्ट ही कायम चर्चेत असतात. कधी त्या राजकीय तर कधी अराजकीय असतात, पण लक्षवेधी असतात हे मात्र खरं. नुकतंच वसंत मोरेंनी फेसबुक वर एक पोस्ट केलीय ज्याची सर्वत्र चर्चा आहे.
अर्थात वसंत मोरेंचे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवरील प्रेम कायम दिसून आले आहे. सतत या ना त्या कृतीतून ते राज ठाकरें सोबतच आहेत हे दाखवून देत असतात. आजही वसंत मोरेंनी पोस्ट केलेल्या फोटोची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. पुणे शहरातील अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक डिजिटल बोर्ड आहे.
वसंत मोरेंचा बालेकिल्ला म्हणजे कात्रज परिसर याच कात्रज चौकात i Love katraj असा डिजिटल बोर्ड आहे. त्यात i च्या पुढे बदाम आणि कात्रज असे इंग्रजी मध्ये लिहिलेले आहे, यातील कात्रज या शब्दातील 'kat' ya शब्दावर लाईट नसल्याने तो झाकला जातोय. आणि i Love Raj असं केवळ दिसतंय, आणि वसंत मोरेंच्या अचूक नजरेनं नेमकं हेच हेरल,
कोणी प्रेम करो ना करो आम्ही मात्र प्रेम करतच राहणार...
परवा रात्री त्या तरुणीला मदत केली तिला गाडीवर बसलेली पाहिली आणि अचानक कात्रजमधील I ❤️ KATRAJ चौकातील बोर्डवर लक्ष गेले तर तिकडे ही वाक्य राहिली होती... म्हणतात ना देवाची करणी आणि नारळात पाणी... अशी पोस्ट वसंत मोरे यांनी लिहिली आहे.