शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
3
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
4
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
5
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
7
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
8
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
9
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
10
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

तुंकुर जिल्हयातील माओवादी हल्ला प्रकरणी वरवरा राव कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 7:43 PM

कर्नाटकामधील तुंकुर जिल्ह्यात २००५ साली माओवाद्यांनी हल्ला केला होता.

ठळक मुद्देभीमा कोरेगाव आणि एल्गारच्या अनुषंगाने दाखल असलेल्या गुन्ह्यात राव यांना गेल्यावर्षी अटक

पुणे  : माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटकेत असलेले कवी वरवरा राव यांना बुधवारी कर्नाटकपोलिसांनी ताब्यात घेतले. कर्नाटकामधील तुंकुर जिल्ह्यात २००५ साली माओवाद्यांनी हल्ला केला होता. याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी कर्नाटक पोलिसांनी येरवडा मध्यवर्ती कारागृहातून राव यांचा ताबा घेतला आहे. भीमा कोरेगाव आणि एल्गारच्या अनुषंगाने दाखल असलेल्या गुन्ह्यात राव यांना गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले होते. नजरकैदेची मुदत संपताच त्यांना 17 नोव्हेंबर 2018 रोजी पुन्हा अटक करून येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. या प्रकरणी अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत, सुधीर ढवळे, रोना विल्सन, व्हर्णन गोन्साल्वीस, अरुण फरेरा, सुधा भारद्वाज यांना अटक करण्यात आली असून ते सर्व येरवडा कारागृहात आहेत. त्यातील काहींच्या जामिनावर युक्तिवाद सुरू आहे.  राव यांना बेकायदेशीर हालचाली प्रतिबंध कायदा (युएपीए) लागू होत नाही. त्यामुळे त्यांना जामीन द्यावा, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली आहे. त्यावर युक्तिवाद सुरू असतानाच त्यांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात पोलिसांनी दहा आरोपींच्या विरोधात विशेष न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे. बंदी असलेल्या सीबीआय माओवादी या संघटनेच्या ईस्टर्न रिजनल ब्युरो (ईआरबी) समितीचा सचिव व केंद्रीय समिती सदस्य किशन दा ऊर्फ प्रशांत बोस आणि रोना विल्सन यांच्यासह संघटनेच्या इतर भूमिगत सदस्यांनी पंतप्रधानांच्या हत्येचा कट केला. एल्गारमुळेच कोरेगाव भीमा येथे दंगल उसळली होती, असे त्यात म्हटले आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीKarnatakकर्नाटकPoliceपोलिसArrestअटक