माझ्या बापाच्या जीवावर हवा करतोय; सुशील हगवणेचा व्हिडीओ व्हायरल, नागरिकांमध्ये संताप
By किरण शिंदे | Updated: May 27, 2025 10:52 IST2025-05-27T10:49:15+5:302025-05-27T10:52:13+5:30
या व्हिडीओत दोघांचा माज आणि दादागिरीचे स्वरुप स्पष्ट दिसत असून, नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे.

माझ्या बापाच्या जीवावर हवा करतोय; सुशील हगवणेचा व्हिडीओ व्हायरल, नागरिकांमध्ये संताप
पुणे - वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणाने राज्यभर खळबळ उडवून दिली असतानाच, आरोपी सुशील आणि राजेंद्र हगवणेचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सुशील हगवणेने त्याच्या इन्स्टाग्रामवरही पोस्ट केला होता. या व्हिडीओत दोघांचा माज आणि दादागिरीचे स्वरुप स्पष्ट दिसत असून, नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे.
व्हिडीओत सुशील हगवणे घोड्यावर बसलेला दिसतो आणि म्हणतो, माझ्या बापाच्या जीवावर हवा करतोय, तुमच्या बापात दम असेल तर तुम्ही पण करा त्याच्यासोबत वडील राजेंद्र हगवणे देखील उपस्थित आहेत. या वक्त्यव्यानंतर हगवणे कुटुंबाची दादागिरी आणि वर्चस्व दाखवण्याची वृत्ती स्पष्ट होते, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणात आतापर्यंत तिचा पती, सासू, नणंद, सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर तपासात आणखी पाच आरोपींची नावे समोर आली असून, त्यात एका माजी मंत्र्याच्या मुलाचाही समावेश आहे. सर्व आरोपी पोलिस कोठडीत असून, पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. सध्या सोशल मीडियावर या व्हिडीओवर जोरदार चर्चा सुरू असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.