हगवणे बंधूंना शस्त्र परवाना, ‘मामां’ची सही..! वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या सुपेकरांनी स्पष्टच सांगितलं

By किरण शिंदे | Updated: May 30, 2025 12:10 IST2025-05-30T12:05:44+5:302025-05-30T12:10:03+5:30

जो संबंधित पोलीस उपायुक्तांकडे पाठवला जातो. त्यानंतर संपूर्ण पडताळणी होऊन पोलीस आयुक्त अंतिम निर्णय घेतात.

Vaishnavi Hagawane Death Case Hagawane brothers get arms license, ‘Uncle’s’ signature..! Supekar, caught in the middle of the controversy, clearly stated | हगवणे बंधूंना शस्त्र परवाना, ‘मामां’ची सही..! वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या सुपेकरांनी स्पष्टच सांगितलं

हगवणे बंधूंना शस्त्र परवाना, ‘मामां’ची सही..! वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या सुपेकरांनी स्पष्टच सांगितलं

पुणे - हगवणे बंधूंना शस्त्र परवाना देण्यात आलेल्या प्रक्रियेसंदर्भात माजी अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि सध्या कारागृह सेवा सुधार विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक असलेले जालिंदर सुपेकर यांचे नाव चर्चेत आल्यानंतर त्यांनी यासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडली आहे. एका व्हॉट्सॲप संदेशाद्वारे दिलेल्या स्पष्टीकरणात सुपेकर यांनी सांगितले की, हगवणे यांना शस्त्र परवाना मीच दिला आहे हे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. त्यांनी असेही नमूद केले की शस्त्र परवाना देण्याचे अधिकार हे संबंधित पोलीस आयुक्तांकडेच असतात.

सुपेकर पुढे म्हणाले, शस्त्र परवाना अर्ज प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम स्थानिक पोलीस स्टेशनकडून अर्जदाराबाबत अनुकूल अथवा प्रतिकूल अहवाल तयार केला जातो, जो संबंधित पोलीस उपायुक्तांकडे पाठवला जातो. त्यानंतर संपूर्ण पडताळणी होऊन पोलीस आयुक्त अंतिम निर्णय घेतात. त्यानंतरच अप्पर पोलीस आयुक्त (प्रशासन) हे आदेश काढतात. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेत माझा कुठलाही थेट सहभाग नसतो. 

या प्रकरणावरून काही माध्यमांतून गैरसमज पसरवले जात असल्याचे नमूद करत सुपेकर यांनी सांगितले की, माझ्या बाबतीत चुकीच्या बातम्या पसरवल्यामुळे मला मानसिक त्रास होत आहे. विनाकारण होणारी ही बदनामी थांबवावी, अशी माझी नम्र विनंती आहे.

हगवणे बंधूंना पुणे ग्रामीण पोलिसांकडून शस्त्र परवाना नाकारण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी पुणे शहर पोलीस दलाकडे अर्ज केला, ज्यावर सुपेकर यांच्या सहीसह प्रक्रिया पुढे गेली. मात्र, यावरून निर्माण झालेल्या गैरसमजांवर त्यांनी आता आपली बाजू मांडून स्पष्टता दिली आहे.

Web Title: Vaishnavi Hagawane Death Case Hagawane brothers get arms license, ‘Uncle’s’ signature..! Supekar, caught in the middle of the controversy, clearly stated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.