"वैष्णवी हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाणला पकडून ठेवलंय, त्याच्याकडे दोन पिस्तुल"; पोलिसांना फोन आला, अन्...

By किरण शिंदे | Updated: May 29, 2025 11:21 IST2025-05-29T11:17:28+5:302025-05-29T11:21:03+5:30

पोलिसांनी निलेश चव्हाणच्या शोधासाठी हालचाली अधिक गतीमान केल्या असून, त्याला देशाबाहेर पलायन करण्यापासून रोखण्यासाठी लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.

Vaishnavi Hagavane death case Nilesh Chavan in Vaishnavi Hagavane case has been arrested he has two pistols call to police | "वैष्णवी हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाणला पकडून ठेवलंय, त्याच्याकडे दोन पिस्तुल"; पोलिसांना फोन आला, अन्...

"वैष्णवी हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाणला पकडून ठेवलंय, त्याच्याकडे दोन पिस्तुल"; पोलिसांना फोन आला, अन्...

पुणे -वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात मुख्य संशयित असलेल्या निलेश चव्हाण याला अटक होण्याआधीच तो फरार झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या शोधासाठी हालचाली अधिक गतीमान केल्या असून, त्याला देशाबाहेर पलायन करण्यापासून रोखण्यासाठी लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी निलेश चव्हाणच्या शोधासाठी विशेष आठ पथकांची स्थापना केली आहे. या पथकांनी विविध ठिकाणी तपास सुरू केला आहे, ज्यामध्ये पुणे, मुंबई, कोकण तसेच कर्नाटक आणि गोवा भागांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याचे मित्र, नातेवाईक व संपर्क असलेल्या व्यक्तींकडेही चौकशी सुरू आहे.



अशात नांदेड सिटी पोलिसांना नुकताच दिलेल्या माहितीमुळे खळबळ उडाली आहे. फरार आरोपी नीलेश चव्हाणला पकडून ठेवले आहे. असा खोटा फोन ११२ या आपत्कालीन क्रमांकावर करून नांदेड सिटी पोलिसांना गाफील करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे पोलिसांचा ताफा घटनास्थळी धाव घेत असतानाच हा सर्व प्रकार फसवणुकीचा असल्याचे उघड झाले.

खोटा फोन करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, आम्ही वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी नीलेश चव्हाणला पकडून ठेवले आहे. त्याच्याकडे दोन पिस्तुलं आहेत आणि आम्ही त्याला मारहाण करून गाडीच्या डिक्कीत ठेवले आहे. या माहितीवर विश्वास ठेवून पोलिसांनी तात्काळ पथक पाठवले.

मात्र चौकशीदरम्यान असे निदर्शनास आले की, फोन करणाऱ्या व्यक्तीने खोटी माहिती देत पोलिसांची दिशाभूल केली होती. आरोपीची ओळख संतोष दत्तात्रय गायकवाड (वय ३३, रा. किरकटवाडी) अशी झाली असून, तो स्वागत हॉटेल (पानशेत रस्ता) येथे सापडला. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने खोटे कॉल केल्याची कबुली दिली. अशी खोटी माहिती देऊन पोलिस यंत्रणेचा गैरवापर केल्याप्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पोलिसांकडून बक्षिसाची रक्कम मिळवण्यासाठी त्याने हे कृत्य केले होते. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, खोट्या माहितीने प्रशासनाचा अपव्यय होतो आणि गंभीर गुन्ह्यांची चौकशी बाधित होऊ शकते. त्यामुळे कोणतीही माहिती देण्यापूर्वी ती खरी आणि खात्रीशीर आहे याची पूर्ण शहानिशा करावी.

तत्पूर्वी, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पती शशांक आणि दीर सुशील हगवणे या बंधूनी त्यांची आई लता आणि बहीण करिष्मा यांचे मोबाईल फरार आरोपी नीलेश चव्हाण याच्या मदतीने लंपास केले आहेत. या मोबाईलमध्ये शशांक याने पत्नी वैष्णवी यांना मारहाण केल्याचे आणि आरोपींमधील संभाषणाचे पुरावे असू शकतात, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी न्यायालयाला दिली. तर आरोपींच्या वकिलाने वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत एखाद्या नवऱ्याने बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही, असा अजब युक्तिवाद केला.

Web Title: Vaishnavi Hagavane death case Nilesh Chavan in Vaishnavi Hagavane case has been arrested he has two pistols call to police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.