शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्ण शर्माने हातात चेंडू असूनही संजू सॅमसनला रन आऊट नाही केले, विराटचे डोक फिरले 
2
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
3
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
4
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
5
हरियाणामध्ये राहुल गांधींसमोरच उफाळला वाद,  काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये बाचाबाची, त्यानंतर...
6
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
7
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
8
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
9
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
10
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
11
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
12
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
13
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
14
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
15
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
16
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
17
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
18
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
19
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
20
टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक

संजय नहार यांच्यासाठीच्या पार्सल बॉम्बचा संबंध वैभव राऊतशी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 11:24 PM

राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीकडून चौकशी; नालासोपारात पुन्हा छापा

पुणे : नालासोपारा येथून अटक केलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडे सापडलेले साहित्य आणि सामाजिक कार्यकर्ते संजय नहार यांच्यासाठी अहमदनगरच्या कुरिअर कार्यालयातून पाठवण्यात येणार असलेले पार्सलमधील साहित्य यांच्यात साधर्म्य असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे हिंदुत्ववादींनीच हा पार्सल बॉम्ब पाठवला होता का, याचा तपास केंद्रीय सुरक्षा एजन्सीकडून सुरु करण्यात आला आहे. वैभव राऊत आणि सुधन्वा गोंधळेकर यांचा त्याच्याशी संबंध आहे का, याचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी एटीएसने आज पुन्हा वैभवच्या घरी व दुकानात जाऊन तपास केला.काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे काम करणाऱ्या सरहद्द संस्थेचे संजय नहार यांच्या नावाने अहमदनगरच्या कुरिअर कार्यालयात २० मार्च २०१८ रोजी एक पार्सल पाठवण्यात आले होते. माळीवाडी येथील मारुती कुरिअरमध्ये दुपारी एका व्यक्तीने हे पार्सल दिले होते. रात्री सव्वा दहा वाजता कुरिअर कंपनीतील संदीप भुजबळ आणि संजय क्षीरसागर यांनी हे जड पार्सल पाहिले व त्यावरील चिठ्ठी वाचली. ही चिठ्ठी एका मुलीने लिहिलेली होती. त्यावर तुम्ही मला खूप मदत केली. त्यामुळे हे पार्सल पाठवत आहे, असे लिहिले होते. ही चिठ्ठी पाहून संशय आल्याने त्यांनी हे पार्सल उघडून लाइट बोर्डासमोर धरले असता त्याचा स्फोट झाला होता. त्यात दोघे जखमी झाले होते.नालासोपारा येथे वैभव राऊत याच्या घरातून व दुकानातून एटीएसने जप्त केलेल्या साहित्यात तयार बॉम्ब व बॉम्ब तयार करण्याचे साहित्य आढळून आले आहे. हे साहित्य आणि संजय नहार यांच्यासाठी पाठवण्यात आलेल्या पार्सलमधील साहित्य यात बराच सारखेपणा आढळून आला आहे. याबाबत संजय नहार यांनी सांगितले की, आज दिल्लीहून आपल्याला राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीतील (एनआयए) एका अधिकाऱ्याचा फोन आला होता. त्याने या पार्सल बॉम्बविषयी चौकशी केली. नालासोपारा येथे सापडलेले साहित्य आणि मला पाठवलेल्या पार्सलमधील बॉम्बमध्ये वापरलेले साहित्य यातील साधर्म्याबद्दल आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Sanjay Naharसंजय नहारPuneपुणेMumbaiमुंबई