शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

पुण्यात लसीकरणाच्या प्रक्रियेतला सावळा गोंधळ संपेच ना ; नागरिकांचा तीव्र संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2021 6:16 PM

शहरातील लसीकरणाचा हा गोंधळ संपणार कधी हा प्रश्न विचारला जात आहे. 

पुणे : लसीकरणाच्या गेले काही दिवस सातत्याने सुरु असलेल्या गोंधळात आज आणखी एका गोंधळाची भर पडली आहे. लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांचे वेळ आणि तारीख दिसत नसल्याने अनेक नागरिकांवर आज वाट पाहण्याची वेळ आली. लसीकरण केंद्रावर रांगा लावुन बसल्यानंतरही काही लोकांना लस न घेताच परत जावे लागले. त्यामुळे लसीकरणाचा हा गोंधळ संपणार कधी हा  प्रश्न विचारला जात आहे. 

लसीकरणासाठी केंद्र सरकारने कोव्हीन ॲप बनवले आहे. या ॲप मध्ये पहिल्या टप्प्यापासुनच अडचणी येत आहेत. नागरिकांना ॲप वापरायला सातत्याने अडचणी येत आहेत. एकीकडे नागरिकांना अडचण येत असताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही लॅागिन पासुन प्रत्येक टप्प्यावर अडचणींचा सामना दररोज करावा लागतोय यामुळे काही केंद्रावर भांडण होण्याचेही प्रकार उद्भवले.

हे सुरळीत होत असतानाच आज पुन्हा नवी तांत्रिक अडचण आली. नोंदणी करुन केंद्रावर आलेल्या नागरिकांची वेळ आणि तारीख कर्मचाऱयांना दिसेना. त्यामुळे अनेकांवर नुसतं वाट पाहत राहण्याची वेळ आली. “ जर असं थांबावं लागत असेल तर वेळ घेवुन येण्याचा उपयोग काय “ असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. 

याविषयी लोकमतशी बोलताना महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल म्हणाल्या ,” तांत्रिक अडचणीबाबत कळल्यास आम्ही ती माहिती ॲपच्या टीमला कळवत आहोत. तसेच नोंदणी अडचणी आल्यास नागरिकांसाठी चार केंद्र सुरु केली आहेत. तिथे थेट जाउन लसीकरण केले जाऊ शकते”.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका