अमेरिकेच्या निवडणुकीत पुण्यातल्या चित्राचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:19 IST2021-02-05T05:19:12+5:302021-02-05T05:19:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक विविध कारणांनी चर्चेचा ठरली, हे सर्वश्रूत आहेच. पण या निवडणुकीतली उल्लेखनीय ...

Use of Pune painting in US elections | अमेरिकेच्या निवडणुकीत पुण्यातल्या चित्राचा वापर

अमेरिकेच्या निवडणुकीत पुण्यातल्या चित्राचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक विविध कारणांनी चर्चेचा ठरली, हे सर्वश्रूत आहेच. पण या निवडणुकीतली उल्लेखनीय बाब म्हणजे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीबद्दल स्त्रियांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी ‘थिंकवूमन’ या राबविलेल्या आलेल्या मोहिमेचे प्रमुख प्रतीक (सिम्बॉल) म्हणून पुण्यातील एका चित्रकार युवतीच्या चित्रकृतीचा वापर करण्यात आला. ही पुणेकरांसाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे.

या चित्रकार युवती आहे वैदही रेड्डी. अमेरिकेतील मेरिलॅन्ड राज्यात ‘थिंक वूमन’ या संस्थेने पुण्यातील वैदेहीच्या चित्रकृतीला मोहिमेत मानाचे स्थान दिले. वैदेहीने आपले शालेय शिक्षण पुण्यातील आर्मी स्कूलमध्ये पूर्ण केले असून तिचे वडील भारतीय लष्करात कार्यरत आहेत. अमेरिकेतील प्रतिष्ठित कॉर्नल विद्यापीठाची सुमारे २ कोटी रुपयांची शिष्यवृत्तीही वैदेहीने मिळवली आहे.

वैदेहीच्या या चित्रकृतीमध्ये सध्याच्या पिढीचे स्त्री चित्रण आहे. शिवाय ही कलाकृती या शतकातील स्त्रीच्या प्रेरणा, विचार व स्वप्न दर्शवते म्हणूनच या चित्रकृतीची निवड ‘थिंक वूमन’ या संस्थेने केली होती. वैदेहीने या चित्राची निर्मिती सन २०१८ मध्ये केली होती. ही चित्रकृती अबस्ट्रॅक्ट कंटेम्पररी स्टाईल प्रकारातील आहे. वैदेहीला यापूर्वी अनेक सन्मान मिळाले आहेत. यापूर्वी तिने २०१४ साली राष्ट्रीय स्तरावरील ‘गुगल डूडल’ स्पर्धा जिंकली होती. अनेक विदेशी सरकारी संस्थांनी तिच्या चित्रकलेतील योगदानाबद्दल तिचा सन्मान केला आहे.

“थिंक वूमन संस्थेने माझे कार्य ऑनलाइन पाहिले आणि माझ्या चित्रकृतीची निवड केली. निवडणुकीच्या प्रक्रियेत महिला जागरूकता आणि महिला मतदारांना भेडसावणाऱ्या गंभीर प्रश्नांविषयीच्या विधायक कार्यासाठी याचा वापर करण्यात आला हे माझ्यासाठी सन्माननीय आहे. ही चित्रकृती एकविसाव्या शतकातील स्त्रीची स्वतंत्र विचारसरणी, प्रेरणा आणि स्वप्ने दाखवते,” असे वैदेहीने सांगितले.

......

Web Title: Use of Pune painting in US elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.