शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

.. तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नको : अजित पवारांचं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 9:02 PM

जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नये...

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील ओबीसीच्या राजकीय आरक्षणासंदर्भात विरोधी पक्षनेते, सर्व पक्षांचे विधीमंडळातील प्रमुख , मुख्य सचिवांसह संबंधित सर्व अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नये अशी भूमिका व्यक्त केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना आठ दिवसांत सर्व अभ्यास करून अहवाल सादर करण्यास सांगितले असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात दिली. 

पुण्यातील दर आठवड्याची कोरोना आढावा बैठक घेतल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषद वरील माहिती दिली. राज्य निवडणूक आयोगाने मुदत संपणाऱ्या नगरपालिका, महापालिकांच्या प्रभाग  रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात ओबीसी आरक्षणाचा प्रश्न कायम असताना नक्की काय होणार असा प्रश्न विचारल्यानंतर पवार यांनी सांगितले, मंत्रीमंडळाची बैठक झाल्यानंतर दोनच दिवसांत मुख्यमंत्र्यांनी आरक्षणासंदर्भात बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्वच पक्षांनी आपली भूमिका,  मते मांडली. यात पालघर,  नंदुरबार सारख्या जिल्ह्यात ओबीसींना एकही प्रतिनिधित्व देता येणार नाही अशा परिस्थितीत राज्यातील सर्व जिल्ह्यातील आरक्षणा सखोल अभ्यास करून येत्या आठ दिवसांत अहवाल सादर करण्यास मुख्य सचिवाना सांगण्यात आले आहे. त्यानंतर सर्व पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.------प्रभाग निश्चितीचा सर्वस्व अधिकार राज्य शासनाचा राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील मुदत संपणाऱ्या महापालिकाच्या एक सदस्य पध्दतीने प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रीया व्यक्त झाल्या आहेत, पण त्या सर्व बकवास आहे. प्रभाग निश्चितीची सर्वस्व अधिकार हे राज्य शासनाचे आहेत. यामध्ये राज्यात मुंबई महापालिकेची निवडणूक एक सदस्य पध्दतीने करण्याचे निश्चित झाले असले तरी, अन्य महापालिकासाठी हा निर्णय लागू नाही. या संदर्भात महाआघाडी एकत्र चर्चा करून प्रभाग निश्चितीचा निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेत एक सदस्यीय पध्दतीने निवडणुका होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. -------राज्यपालांना 1 सप्टेंबरला भेटणार दोन दिवसापूर्वी राज्यपालांना भेटण्याचे ठरवले होते, पण राज्यपाल बाहेरगावी असल्याने भेटता येणार नसल्याचा निरोप पाठवला होता. त्यात आता शनिवार,  रविवार व पुढील आठवड्यात काही सुट्ट्या आल्याने राज्यपालांनी 1 सप्टेंबर ची वेळ दिली आहे. त्यामुळे मी आणि मुख्यमंत्री राज्यपालांना भेटून 12 सदस्यांचा प्रश्नी चर्चा करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारElectionनिवडणूकOBCअन्य मागासवर्गीय जातीOBC Reservationओबीसी आरक्षणState Governmentराज्य सरकार