खबरदार! रेल्वेत विनाकारण साखळी ओढल्यास अटकेसोबत होऊ शकतो दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 02:58 PM2022-09-22T14:58:13+5:302022-09-22T15:02:23+5:30

विनाकारण साखळी ओढली तर कोणा एकाच्या चुकीमुळे सर्व प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो...

Unreasonable chain pulling on the train can lead to arrest along with fine | खबरदार! रेल्वेत विनाकारण साखळी ओढल्यास अटकेसोबत होऊ शकतो दंड

खबरदार! रेल्वेत विनाकारण साखळी ओढल्यास अटकेसोबत होऊ शकतो दंड

Next

पिंपरी :रेल्वेने प्रवास करताना आपत्कालीन स्थिती ओढवल्यास साखळी ओढणे अपेक्षित असते. विनाकारण साखळी ओढली तर कारवाई होऊ शकते. अशा प्रकरणात अटक आणि दंडदेखील होऊ शकतो. त्यामुळे प्रवाशांना विनाकारण साखळी ओढणे महागात पडू शकते. रेल्वे प्रवासात हजारो प्रवासी एकावेळेस प्रवास करीत असतात. विनाकारण साखळी ओढली तर कोणा एकाच्या चुकीमुळे सर्व प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो.

साखळी ओढून रेल्वे थांबविल्याप्रकरणी मागील वर्षी पुणे स्थानकावर एसीपी (अलार्म चेन पुलिंग) च्या ९२९ घटना घडल्या होत्या. याप्रकरणी ८०३ प्रवाशांना आरपीएफकडून अटक करण्यात आली होती. आपत्कालीन परिस्थितीत साखळी ओढली तर रेल्वे प्रशासन कारवाई करीत नाही. परंतु, विनाकारण साखळी ओढली किंवा किरकोळ कारणासाठी साखळी ओढली तर कारवाई करण्यात येते.

साखळी ओढल्यावर काय होते ?

साखळी ओढल्यावर रेल्वे इंजिनचे बीपी प्रेशर डाऊन होते. म्हणजेच बोगीच्या खालच्या पाईपमधून मोठा आवाज करून हवा बाहेर पडते. प्रेशर डाऊन होऊन गाडी थांबते. कोणत्या डब्यात साखळी ओढली आहे, हे समजण्यासाठी डब्यांच्या आत आणि बाहेर इंडिकेस्टस् लाल लाईट लागतो. याची माहिती रेल्वे चालकाला मिळते. गाडी सेक्शनमध्ये असेल तर सहायक रेल्वे चालक गार्ड हे कोचची पाहणी करतात. गाडी स्थानकावर असेल तर त्यावेळी आरपीएफकडून शोध घेतला जातो.

या कारणांसाठी साखळी ओढा

साखळी कधी ओढावी, यासाठी रेल्वे प्रशासनाने काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार गाडीत आग लागली, किंवा डब्यातून धूर निघत असेल, एखादा प्रवासी दरवाजातून पडला असेल. तसेच कोणी खिडकीला लटकला असेल, कोणी रेल्वेखाली येत असेल, अशा आपत्कालीन स्थितीत साखळी ओढली पाहिजे.

गेल्या वर्षी ९०२ वेळा रेल्वे थांबली

गेल्या वर्षी ९०२ वेळा साखळी ओढून रेल्वे थांबविण्यात आली आहे. यात प्रवाशांनी दिलेले कारण रेल्वेला अमान्य झाल्याने प्रशासनाने प्रवाशाला ताब्यात घेऊन अटकेची कारवाई केली आहे. या प्रवाशांकडून जवळपास १ लाख ४१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Web Title: Unreasonable chain pulling on the train can lead to arrest along with fine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.