Child Abuse: तीन अल्पवयीन मुलांवर गॅरेजमध्ये नेऊन अनैसर्गिक कृत्य; नराधमाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 17:40 IST2022-01-13T17:40:00+5:302022-01-13T17:40:08+5:30
अल्पवयीन मुलांना गॅरेजमध्ये नेऊन त्यांच्यावर वारंवार अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला

Child Abuse: तीन अल्पवयीन मुलांवर गॅरेजमध्ये नेऊन अनैसर्गिक कृत्य; नराधमाला अटक
पुणे : तिघा अल्पवयीन मुलांना गॅरेजमध्ये नेऊन त्यांच्यावर वारंवार अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी एका नराधमाला अटक केली आहे. विनायक बबन वाघ (वय ४८, रा. मानाजीनगर, नर्हे) असे या नराधमाचे नाव आहे. याप्रकरणी एका ३३ वर्षाच्या नागरिकाने फिर्याद दिली आहे. ही घटना नोव्हेंबर २०२१ ते १० जानेवारी २०२२ दरम्यान घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांची १३, १० व ७ वर्षाच्या मुलांना उजवी भुसारी कॉलनी येथील एका गॅरेजच्या आत नेले. तेथे त्यांचे कपडे काढून त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. कोणाला काही सांगितले तर मारुन टाकण्याची धमकी दिली. वारंवार हा प्रकार होऊ लागल्याने शेवटी या मुलांनी घरी सांगितले. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली. कोथरुड पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे.