चाकण : नाणेकरवाडी परिसरात पुणे-नाशिक महामार्गावरील नाणेकरवाडी परिसरातील नागेश्वर मार्बल अँड ग्रॅनाईट दुकानाच्या गोडाऊन शटरला ३५ ते ४० वर्षाच्या एका अज्ञात इसमाने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी (दि.१३ .) रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली आहे. याबाबत संजय अशोक सांबर ( वय ४५, रा. आयफेल सिटी, बी २०८, चाकण, मूळगाव- मध्यप्रदेश ) यांनी फिर्याद दिली आहे. संजय हे १२ मार्चला रात्री ९ वाजता दुकान बंद करून घरी गेले होते त्यांच्या दुकानात झोपायला असलेल्या तीन कामगारांपैकी राहुल यादव याने १३ मार्च रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमाने आपल्या दुकानाच्या शटरला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फोनवरून सांगितले. अंगाने सडपातळ, अंगात पांढऱ्या रंगाचा टी शर्ट, ग्रे रंगाची पॅन्ट, चेहरा उभट, डोक्यास बारीक काळे केस, तुरळक बारीक मिशी व तुरळक दाढी, पायात स्लीपर असे मयत इसमाचे वर्णन आहे. फिर्यादी संजय याने दुकान मालक सुदाम महादू नाणेकर यांना घटनेची कल्पना देऊन चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मुस्ताक शेख पुढील तपास करीत आहेत.
दुकानाच्या शटरला अज्ञात इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 17:09 IST
पुणे-नाशिक महामार्गावरील नाणेकरवाडी परिसरातील घटना.
दुकानाच्या शटरला अज्ञात इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
ठळक मुद्दे ही घटना मंगळवारी (दि.१३ .) रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली आहे.याबाबत संजय अशोक सांबर ( वय ४५, रा. आयफेल सिटी, बी २०८, चाकण, मूळगाव- मध्यप्रदेश ) यांनी फिर्याद दिली आहे.