शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
2
‘१५ सेकंदांसाठी पोलीस हटवा, कळणारही नाही की…’ नवनीत राणांचं ओवेसी बंधूंना आव्हान, एमआयएम संतप्त
3
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
4
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
5
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
6
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
7
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
8
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
9
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...
10
Rekha Jhunjhunwala यांच्या संपत्तीत 'या' एका शेअरनं लावला सुरुंग; महिन्याभरात संपत्तीत ₹२३०० कोटींची घट
11
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
12
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
13
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
14
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
15
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
16
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
17
मेलो तरी चालेल; धनुष्य-बाण, हात, कमळावर लढणार नाही; महादेव जानकर यांचे महत्वाचे वक्तव्य
18
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
19
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
20
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द

दूरस्थ प्रवेशासाठी विद्यापीठाची तुघलकी नियमावली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 7:00 AM

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बहि:स्थ अभ्यासक्रम बंद करून दूरस्थ अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला...

ठळक मुद्देपरीक्षा देण्यास मज्जाव ; निकाल राखून ठेवणार, शुल्क परत देणार नाही

- राहुल शिंदे - पुणे: सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठातर्फे दूरस्थ अभ्यासक्रमाची प्रवेशाची नियमावली  वादग्रस्त असल्याचे समोर आले आहे.या निमवालीत विद्यापीठास शासनाकडून शिष्यवृत्ती संदर्भातील शुल्क प्राप्त झाले नाही तर संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास मज्जाव केला जाईल; परीक्षा दिलेली असले तर त्याचा निकाल राखून ठेवण्यात येईल. काही विद्यार्थी प्रवेशास अपात्र ठरल्यास त्याचा प्रवेश रद्द केला जाईल, मात्र त्याला शुल्क परत दिले जाणार नाही,अशा नियमांचा समावेश करण्यात आला आहे.त्यास विविध विद्यार्थी संघटनांकडून विरोध केला जात आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बहि:स्थ अभ्यासक्रम बंद करून दूरस्थ अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, बहि:स्थ अभ्यासक्रम बंद करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना कोणतीही पूर्व कल्पना दिली नव्हती.त्यात ऑगस्ट महिना अखेरीस सुरू करण्यात आलेल्या दूरस्थ अभ्यासक्रमाच्या नियमावलीत विद्यार्थ्यांवर चूकीचे नियम लादण्यात आले आहेत. तसेच संबंधित नियम मान्य असल्याबाबतचा करार ऑनलाईन पद्धतीने करून घेतला जात आहे.विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नावनोंदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना करार पत्र दिसते. त्यात प्रवेशापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि विद्यार्थी यांच्यात करार करून घेत जातो. करारातील सर्व नियम विद्यार्थ्यांनी मान्य करून accept बटनावर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांना अर्ज भरता येतो. मात्र, सध्या विद्यापीठाचे वादग्रस्त नियम विद्यार्थ्यांना मान्य करावे लागत आहे. त्यात विद्यापीठाने बहि:स्थ अभ्यासक्रम बंद केल्यामुळे नोकरी करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना,गृहिणींना व काही कारणास्तव शिक्षण अपूर्ण राहिलेल्या विद्यार्थ्यांना दूरस्थ अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही.दरवर्षी सुमारे 18 ते 20 हजार विद्यार्थी बहि:स्थ अभ्यासक्रमास मार्गदर्शन घेत होते.विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेमार्फत दूरस्थ अध्ययन पद्धतीवर आधारित बी.ए., बी.कॉम., एम.ए., एम.कॉम. व एमबीए या अभ्याक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दोन दिवसातच सुमारे 2,200 हून अधिक विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नावनोंदणी केली आहे.मात्र,विद्यापीठाने हे वादग्रस्त नियम रद्द करावेत,अन्यथा आंदोलन केले जाईल,असा इशारा विद्यार्थी संघटनांनी दिला आहे.त्यामुळे विद्यापीठाला या नियमावलीमुळे विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते,असे बोलले जात आहे.याबाबत विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेचे संचालक डॉ.संजीव सोनवणे म्हणाले,दूरस्थ विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती मिळत नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांचे निकाल रोखणे ,परीक्षेला बसू न देणे यासंदभार्तील नियमात बदल केले जातील. विद्यापीठ विद्यार्थ्यांचे शुल्क परत करण्याबाबत सकारात्मक आहे.............बहि:स्थनंतर विद्यापीठाचा दूरस्थ आभ्यासक्रम वादग्रस्त  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बहिस्थ अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतल्याने विविध क्षेत्रातून विद्यापीठावर टीका झाली होती.त्यानंतर विद्यापीठाने बहि:स्थ अभ्यासक्रमाच्या शुल्कात वाढ केली. त्यामुळे विद्यापीठाला विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.आता दूरस्थ अभ्यासक्रम सुरू करून विद्यापीठ वादग्रस्त नियमावलीमुळे पुन्हा एकदा चर्चेत येणार आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बहि:स्थ अभ्यासक्रम बंद करून गरजू विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे.त्याता आता दूरस्थ अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची वादग्रस्त नियमावली विद्यार्थ्यांवर लादली जात आहे.विद्यापीठाने ही नियमावली मागे घेतली नाही तर तीव ्रआंदोलन केले जाईल.- कल्पेश यादव,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना,पुणे शहर.............परीक्षेला बसण्यास मज्जाव करणे, निकाल राखून ठेवणे, शुल्क परत न करणे,असे चूकीचे नियम विद्यार्थ्यांवर लादणे हे अन्यायकारक आहे .विद्यापीठाने तात्काळ वादग्रस्थ नियम मागे घ्यावेत,अन्यथा एनएसयुआय आंदोलन केले जाईल.- अक्षय जैन,एनएसयुआय...........दूरस्थ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांवर लादलेल्या अटी चुकीच्या व तुघलकी आहेत.विद्यापीठाने विद्यार्थ्यांची पिळवणूक थांबवावी,अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल. -ऋषी परदेशी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस,उपाध्यक्ष,महाराष्ट्र प्रदेश

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठStudentविद्यार्थीEducationशिक्षण