विद्यापीठ अधिसभा; व्यवस्थापनच्या जागांवर प्रगती पॅनलचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 03:24 AM2017-11-28T03:24:04+5:302017-11-28T03:24:06+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत व्यस्थापनच्या प्रतिनिधी पदांच्या ५ पैकी ३ जागा पटकावून विद्यापीठ प्रगती पॅनलने बाजी मारली आहे. तर, विद्यापीठ एकता पॅनलला २ जागा मिळाल्या आहेत.

 University Legislature; Progress panel flag for management seats | विद्यापीठ अधिसभा; व्यवस्थापनच्या जागांवर प्रगती पॅनलचा झेंडा

विद्यापीठ अधिसभा; व्यवस्थापनच्या जागांवर प्रगती पॅनलचा झेंडा

Next

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत व्यस्थापनच्या प्रतिनिधी पदांच्या ५ पैकी ३ जागा पटकावून विद्यापीठ प्रगती पॅनलने बाजी मारली आहे. तर, विद्यापीठ एकता पॅनलला २ जागा मिळाल्या आहेत. विद्यापीठ प्रगती पॅनलचे संदीप कदम, राजेंद्र विखे-पाटील विजयी झाले, तर सुनेत्रा पवार या बिनविरोध निवडून आल्या. विद्यापीठ विकास मंच प्रणित एकता पॅनलचे सोमनाथ पाटील, श्यामकांत देशमुख विजयी झाले.
अधिसभा निवडणुकीत व्यवस्थापन प्रतिनिधिपदाच्या ६ जागा आहेत. त्यांपैकी एक जागा बिनविरोध झाली, तर अनुसूचित जाती प्रवर्गाची जागा उमेदवार न उपलब्ध झाल्याने रिक्त राहिली. त्यामुळे उर्वरित ४ जागांसाठी निवडणूक झाली. अधिसभा निवडणुकीसाठी २२८ मतदार होते. त्यांपैकी २२५ इतके (९८ टक्के) विक्रमी मतदान झाले होते; मात्र २२५ पैकी २२० मते वैध ठरली होती.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूक मतमोजणी प्रक्रियेला सकाळी ८ वाजता सुरूवात झाली. त्यानंतर लगेच १० वाजेपर्यंत व्यवस्थापनचे निकाल जाहीर झाले. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत ५६ मते घेऊन सोमनाथ पाटील विजयी झाले. त्यानंतर दोन फेºया झाल्या. चौथ्या फेरीत श्यामकांत देशमुख ५१, संदीप कदम ४५ तर राजेंद्र विखे-पाटील ४२ मते घेऊन विजयी झाले. व्यवस्थापन प्रतिनिधिपदासाठी दोन्ही पॅनलमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. महिला गटातून सुनेत्रा पवार बिनविरोध विजयी झाल्याने विद्यापीठ प्रगती पॅनलच्या खात्यात यापूर्वीच एक जागा जमा झाली होती. निवडणुकीनंतर प्रगती पॅनेलकडे ३, तर एकता पॅनलला २ जागा मिळाल्या.

अशी झाली मतमोजणी

0253 2328936व्यवस्थापन प्रतिनिधी मतमोजणीच्या पहिल्या फेरीत सोमनाथ पाटील ५६ मते घेऊन विजयी झाले. विजयी होण्यासाठी ४५ मतांचा कोटा आवश्यक होता. त्यामुळे त्यांची जास्तीची असलेली ११ मतांचा दुसरा पसंतीक्रम मोजला गेला. त्यानंतर कमी मते मिळालेल्या राजीव जगताप, दीपक शहा यांचीही दुसºया पसंतीक्रमाची मते मोजली गेली. त्यानुसार चौथ्या फेरीत श्यामकांत देशमुख ५१, संदीप कदम ४५ तर राजेंद्र विखे-पाटील ४२ मते घेऊन विजयी झाली.

अधिसभा निवडणुकीत विजयी झालेल्या चारही उमेदवारांनी विद्यार्थी केंद्रीत भूमिका बजावणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. पक्षीय मतभेद विसरून विद्यार्थी हा एकच पक्ष मानून काम करू अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

अभ्यासक्रमांमध्ये सुधारणा करण्यासाठी अधिसभेच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर काम करणार आहे. - सोमनाथ पाटील
अधिसभेमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रश्न प्राध्यान्याने मांडणार आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून काम करू. - राजेंद्र विखे-पाटील
ग्रामीण भागातील महाविद्यालयांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे, त्यांच्या सोडवणुकीसाठी पुढाकार घेऊ. - संदीप कदम
संस्था, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी, महाविद्यालय, विद्यार्थी यांचे प्रश्न अधिसभेत मांडून ते सोडवण्यासाठी पाठपुरावा करू. - श्यामकांत देशमुख

Web Title:  University Legislature; Progress panel flag for management seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.