शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

अद्वितीय, अलौकिक... मेधा कुलकर्णींनी मोदींना बांधली राखी, केली एक विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2021 2:05 PM

भाजपसाठी सर्वात सुरक्षित विधानसभा मतदारसंघ असलेल्या कोथरूडमधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रकांत पाटील यांना पक्षाने उमेदवारी दिल्याने, मेधा कुलकर्णी भलत्याच नाराज झाल्या होत्या.

ठळक मुद्देया भेटीत पुण्यातील लसीकरण, शनिवार वाड्याच्या जीर्णोद्धारासाठी निधी आदी विषयांवर चर्च केली. तसेच, कोरोना काळात वैधव्य आलेल्या महिलांना एकरकमी ५ लाख ₹ अथवा दरमहा ५००० ₹ वेतन देण्यात यावे यासाठी आपण राज्य सरकारांना सूचना करावी

पुणे - कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची भाजपने समजूत काढत, त्यांचे राजकीय पुनर्वसन करून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाचा मान दिला आहे. महाराष्ट्र राज्यातून असलेल्या एकमेव जागेसाठी कुलकर्णी यांची काही महिन्यांपूर्वी निवड करण्यात आली होती. त्यानंतर, आता मेधा कुलकर्णी यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. विशेष म्हणजे रक्षाबंधन सणानिमित्त त्यांनी मोदींना राखीही बांधली. 

भाजपसाठी सर्वात सुरक्षित विधानसभा मतदारसंघ असलेल्या कोथरूडमधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रकांत पाटील यांना पक्षाने उमेदवारी दिल्याने, मेधा कुलकर्णी भलत्याच नाराज झाल्या होत्या. त्यानंतर पक्षाच्या कित्येक कार्यक्रमांना गैरहजर राहून त्यांनी आपली नाराजीही व्यक्त केली. त्या पक्षाच्या कुठल्याच पदावरही कार्यरत राहिल्या नाहीत़. पण, दरम्यानच्या काळात त्यांनी स्वत:चा जनसंपर्क कायम ठेवला. कुलकर्णी यांना विधान परिषदेवर संधी देण्यात येईल असे सांगण्यातही आले.परंतु, हे आश्वासनही आश्वासनच राहिले. त्यानंतर, पक्षाने त्यांच्यावर राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. कोविडमुळे त्यांच्या राष्ट्रीय नेत्यांच्या भेटीगाठी झाल्या नाहीत. पण, नुकतेच त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.  या भेटीत पुण्यातील लसीकरण, शनिवार वाड्याच्या जीर्णोद्धारासाठी निधी आदी विषयांवर चर्च केली. तसेच, कोरोना काळात वैधव्य आलेल्या महिलांना एकरकमी ५ लाख ₹ अथवा दरमहा ५००० ₹ वेतन देण्यात यावे यासाठी आपण राज्य सरकारांना सूचना करावी, अशी विनंतीही केल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच, मेधा कुलकर्णींनी या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखीही बांधली आहे. 

भविष्यात मोठ्या संधींचे आश्वासन

पुणे महापालिकेत नगरसेवक राहिलेल्या व कोथरूडमधून सन २०१४ मध्ये आमदार झालेल्या कुलकर्णी यांची नाराजी दूर करण्यासाठी, सध्या पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे. ही नियुक्ती करण्यापूर्वीच पक्षातील अन्य वरिष्ठांनीही त्यांची भेट घेऊन या पदाचा स्वीकार करावा, भविष्यात तुम्हाला मोठी संधी दिली जाईल, असा पुन्हा एकदा शब्द दिला असल्याचे समजते. 

टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRaksha Bandhanरक्षाबंधनcorona virusकोरोना वायरस बातम्या