शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील ‘बी मॅन’ची अनोखी मोहीम; राज्यभरातूनही मिळतोय प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 13:10 IST

‘मध हवाय पण मधमाश्या नको’ ही वृत्तीच चुकीची असल्याचे जाणवल्याने पुण्यातील आयटीमधल्या मेकॅनिकल इंजिनिअर तरूणाने मधमाशा संवर्धन मोहीम सुरू केली आहे.

ठळक मुद्देआयटी इंजिनिअरपासून ते बी मॅन पर्यंतचा अमित गोडसे याचा प्रवास रंजकआदिवासी जमाती आणि शेतकऱ्यांकडून घेतले मधमाशा हाताळण्याचे रितसर प्रशिक्षण

पुणे : घराच्या दरवाज्याच्या कोपऱ्यात, झाडांवर किंवा सोसायटींमधील एका भिंतीवर मधमाशांचे पोळे लागलेले दिसले, की ते पोळे जाळून टाकणे किंवा पेस्ट कंट्रोल करून मधमाश्या मारून टाकण्याचा पर्याय निवडला जातो. परंतु  ‘मध हवाय पण मधमाश्या नको’ ही वृत्तीच चुकीची असल्याचे जाणवल्याने पुण्यातील आयटीमधल्या मेकॅनिकल इंजिनिअर तरूणाने मधमाशा संवर्धन मोहीम सुरू केली आहे. मधमाश्या हाताळण्याचे विशिष्ट तंत्र आत्मसात करीत पोळ्यांमधील मधमाश्या वाचवून त्यांचे इतर जागी पुनर्वसन करण्याचे काम हा पुण्याचा ‘बी मॅन’ करीत असून, या मोहिमेला राज्यासह देशभरातून चांगला प्रतिसाद मिळ्त आहे. मधमाशांच्या संवर्धन मोहिमेमुळे अल्पावधीतच अमित गोडसे या तरूणाची ‘बी मॅन’अशी एक आगळीवेगळी ओळख निर्माण झाली आहे. आयटी इंजिनिअरपासून ते बी मॅन पर्यंतचा त्याचा हा प्रवास तितकाच रंजक आहे. वारजे येथील निवासी सोसायटीमध्ये पेस्ट कंट्रोल करून मधमाश्यांचे पोळे जाळल्यानंतर सगळ्या मधमाश्या जमिनीवर मरून पडल्याचे पाहिल्यानंतर त्याला वाईट वाटले. ‘मध पाहिजे पण मधमाश्या नकोत’ ही वृत्ती पाहून तो अस्वस्थ झाला आणि तेव्हाच या मधमाशांना वाचविण्यासाठी काही करता येईल का याचा त्याने ध्यास घेतला. सेंट्रल बी रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटसह आदिवासी जमाती आणि शेतकऱ्यांकडून त्याने मधमाशा हाताळण्याचे रितसर प्रशिक्षण घेतले. भारतातील विविध भागात फिरून त्याने मधमाशा समजून घेण्यासाठीची तंत्र आत्मसात केली. मधमाशांच्या पाच प्रजाती असून, कुठल्या प्रजाती कुठल्या भागात पाहायला मिळतात याचा त्याने अभ्यास केला. त्यानंतर त्याने मधमाशा संवर्धनाची मोहीम हाती घेतली. पाच जणांच्या टीमसमवेत ‘बी बास्केट एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड’ नावाची कंपनीही त्याने स्थापनाही केली. मोहिमेच्या माध्यमातून करीत असलेल्या जनजागृतीमुळे मधमाशा वाचविण्याची एक मानसिकता समाजात निर्माण होऊ लागली आहे. आज घर, बाग किंवा सोसायट्यांमध्ये कुठेही मधमाशांची पोळी तयार झाली की त्याला हात न लावता या मधमाशा वाचविण्यासाठी त्याला दूरध्वनी करून बोलावले जाते. हेच त्याच्या कामाचे यश म्हणावे लागेल.  

या मोहिमेविषयी ‘लोकमत’शी बोलताना अमित गोडसे म्हणाला,  मध हवे असेल तर मधमाशा टिकायला हव्यात. पण बरेचदा मधमाशांच्या पोळ्यांवर पेस्ट कंट्रोल करून किंवा ती जाळून मधमाशांना मारण्याचे प्रकार केले जातात. जे अत्यंत चुकीचे आहे. या मधमाशा केवळ वाचल्याच पाहिजे असे नाही तर त्यांचे संवर्धन करण्याबरोबरच त्यांची संख्याही वाढली पाहिजे. हा विचार करून ही मोहीम हाती घेतली. मधमाश्या हाताळायच्या कशा, पोळ्यांमधून मधमाशा बाहेर कशा काढायच्या या माहितीच्या अभावामुळे पोळी नष्ट करण्याचेच प्रकार घडत आहेत. मात्र मधमाशांना हाताळण्याचे तंत्र आमच्या टीमने आत्मसात केले असल्याने गेल्या दोन वर्षात ८०० पोळांचे स्थलांतर करण्यात आम्हाला यश आले आहे. या मोहिमेला पुण्यासह राज्य आणि देशभरातूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. मधमाशा हाताळण्याचे एक विशिष्ट तंत्र असल्याने काही लोकांना त्याचे प्रशिक्षण देण्यासाठीही आम्ही पुढाकार घेतला आहे. यातून किमान २५ प्रशिक्षणार्थी तयार करण्याचा आमचा मानस असल्याचे त्याने सांगितले.

मधमाशांच्या प्रजातीनुसार हाताळले जाते तंत्रसाधारणपणे मधमाशांच्या पाच प्रजाती पाहायला मिळतात. त्या प्रजातीनुसार त्यांना हाताळण्याच्या तंत्राचा उपयोग केला जातो. जसे ट्रायगोना जातीच्या मधमाश्या अंधारात पोळी बनवितात. जी छोटी असतात. ती पोळी अंधारात कट करून पेटीत भरून दुसऱ्या जागी त्यांचे पुनर्वसन केले जाते. सकाळी माशा नवीन ठिकाणी कामाला सुरूवात करतात. यासाठी इको फ्रेंडली तंत्र वापरले जात असल्याचे अमित गोडसे याने सांगितले.  

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरी