शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

'बोट दाखवेल तेथे बोटसेवा सुरू झालीच पाहीजे'; राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यात अनोखे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 11:58 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजपच्या विरोधात पुणे महापालिकेसमोर आंदोलन

पुणे : गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे पुणे शहरात अनेक ठिकाणी तळी साठल्यासारखी परिस्थिती झाली आहे. सध्या पुणे मनपात प्रशासकराज सुरू आहे. त्यापूर्वी भाजपचा महापौर पालिकेवर होता. शहरात पावसामुळे जागोजागी खोदून ठेवलेल्या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. अनेक ठिकाणी दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी साठलंय. भाजप सत्तेत असताना त्यांनी पुणेकरांची दुर्दशा केली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज करण्यात आला. भाजपच्या कारभाराचा निषेध करत पुणे महापालिकेच्या इमारतीसमोर राष्ट्रवादीकडून बोट आंदोलन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पालिकेसमोर बोट आणून त्यात बसून घोषणा दिल्या. सध्या शहरात अनेकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी गेलं आहे. ड्रेनेज लाईन तुटलेल्या होत्या. अनेक ठिकाणी तर रस्त्यांना ओढ्याचे स्वरुप झाले होते. एकंदरीत पुणेकरांची कालच्या पावसाने दाणादाण उडविली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे शहर स्मार्ट करण्याची घोषणा केली होती. परंतु पुण्यातील भाजपाच्या कारभाऱ्यांनी मात्र पुणे आणि पुणेकरांची दुर्दशा केली आहे, असा आरोप राष्ट्रवादीकडून यावेळी करण्यात आला.

गेली पाच वर्षे मनपातील कारभार तर देशाच्या पंतप्रधांनानी दिलेल्या वचनाला हरताळ फासणारा होता. पुणेकरांची स्मार्ट सिटी भाजपाने पाण्यात बुडवून टाकली. याचा तसेच देशाच्या पंतप्रधानांचा शब्द खोटा ठरविल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निदर्शने व आंदोलन करण्यात आल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेagitationआंदोलनNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाMuncipal Corporationनगर पालिकाRainपाऊस