शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

रासायनिक खताच्या किंमतीत वाढ; शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन; वाहिली खताच्या पिशवीला श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 3:06 PM

शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करू म्हणत सत्तेवर आलेले केंद्र सरकार प्रत्यक्षात रासायनिक खतांची दरवाढ, इंधन दरवाढ, किटकनाशकांची दरवाढ, बियाण्याची दरवाढ सातत्याने करत आहे

बारामती : निमगाव केतकी येथे शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने रासायनिक खतांच्या किंमती वाढवल्या निषेधार्थ खताच्या पिशवीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. बुधवारी (दि. १९) अनोख्या पद्धतीने केलेल्या आंदोलनाची तालुक्यात चर्चा होती. तर रासायनिक खताच्या किंमती तातडीने कमी कराव्यात अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.

यावेळी बोलताना शेतकरी सुकाणू समितीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. श्रीकांत करे म्हणाले,  शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करू म्हणत सत्तेवर आलेले केंद्र सरकार प्रत्यक्षात रासायनिक खतांची दरवाढ, इंधन दरवाढ, किटकनाशकांची दरवाढ, बियाण्याची दरवाढ सातत्याने करत आहे. सरकारने उत्पादन नव्हे तर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च दुप्पट केला आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे.

एकेकाळी भारतामध्ये अन्नधान्याची प्रचंड टंचाई त्यामुळे उपासमार होत होती. त्यामुळे देशात प्रचंड प्रमाणात अन्नधान्याची आयात होत होती. रासायनिक खतांची आणि बियाणांमुळे आपण अन्नधान्यात सक्षम झालो. परंतु आता रासायनिक खतांच्या किंमती सरकारने प्रचंड प्रमाणात वाढवून शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे. याचा निषेध म्हणून निमगाव केतकी येथे शेतकरी सुकानु समिती पुणे जिल्ह्याच्या व समस्त शेतकरी वर्ग यांच्या वतीने गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत रासायनिक खतांच्या किंमती कमी कराव्यात अशी मागणी केली. 

टॅग्स :BaramatiबारामतीFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकारMONEYपैसा