वाई-मांढरदेवी घाटात अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 19:40 IST2018-04-16T19:40:04+5:302018-04-16T19:40:04+5:30
पोलिसांनी प्राथमिक अंदाजावरुन तरी या महिलेचा खून करण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

वाई-मांढरदेवी घाटात अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला
ठळक मुद्देमहिलेचे वय साधारण 24 असून हातावर बानू असे गोंदलेले
मांढरदेवी: वाई - मांढरदेवी घाटात मालवाठार या वळणावरील जंगल परिसरात एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला आहे. ही घटना रविवारी उघडकीस आली. या महिलेच्या मानेवर धारदार शास्त्राने वार करून मृतदेह रस्त्यापासून दीडशे फुटावर जंगलात फेकून दिल्याचे पोलिसांना प्रत्यक्षदर्शनी दिसून आले. वाई पोलिसांकडून प्राथमिक तपासाच्या अंदाजावरुन तरी या महिलेचा खून करण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अद्यापही या महिलेची ओळख पटलेली नसून या महिलेचे वय साधारण २४ असून अंगावर लाल,हिरव्या रंगाचा सलवार कुडता, हातावर बानू असे गोंदलेले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विनायक वेताळ तसेच त्रिंबक अहिरेकर करत आहेत.