Pune: सुपे-मोरगाव रस्त्यावरील शेतात आढळला अनोळखी मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 20:39 IST2023-06-13T20:38:42+5:302023-06-13T20:39:50+5:30
सुपे ( पुणे ) : भोंडवेवाडी हद्दीतीतील सुपे मोरगाव रस्त्यावरील शेतात एका पुरुष व्यक्तीचा अनोळखी मृतदेह आढळून आल्याची घटना ...

Pune: सुपे-मोरगाव रस्त्यावरील शेतात आढळला अनोळखी मृतदेह
सुपे (पुणे) : भोंडवेवाडी हद्दीतीतील सुपे मोरगाव रस्त्यावरील शेतात एका पुरुष व्यक्तीचा अनोळखी मृतदेह आढळून आल्याची घटना मंगळवारी (दि. १३) घडली.
यासंदर्भातील खबर भोंडवेवाडीच्या पोलिस पाटील प्रज्ञा कैलास भोसले (वय ३९) यांनी याबाबतची खबर पोलिसांना दिली. मेंढपाळास हा मृतदेह आढळून आला. त्याने तत्काळ जमीन मालकास घडलेली घटना सांगितली. त्यानंतर चव्हाण यांनी पोलिसात याबाबत माहिती दिली.
पोलिस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यक्तीचा मृत्यू हा १५ ते २० दिवसांपूर्वी झाल्याचे दिसून येत आहे. पोलिस दप्तरी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.