शहरं
Join us  
Trending Stories
1
४-५ महिने थांबा, मला सरकार बदलायचंय; शरद पवारांचं मोठं विधान, मोदींवर निशाणा
2
महाराष्ट्र काँग्रेसची मोठी कारवाई! माजी आमदार नारायणराव मुंडे ६ वर्षांसाठी निलंबित
3
सोशल मीडियात अजित पवारांना टार्गेट करण्यासाठी...: खासदार सुनील तटकरेंचा गंभीर आरोप
4
"मोदी-शाहांसमोर बोलण्याची शिंदे-फडणवीस, अजित पवारांची हिंमत नाही, महाराष्ट्रावर पुन्हा अन्याय"
5
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विनोद तावडेंचं नाव आघाडीवर का?; जाणून घ्या कारणं
6
मराठा-ओबीसी वाद मिटवण्यासाठी फडणवीस निभावणार निर्णायक भूमिका; भुजबळांबद्दल म्हणाले...
7
Ration Card Aadhar Card : सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा! रेशन कार्ड आधारशी लिंक करण्याची मुदत वाढवली
8
मोठी बातमी: मविआचा तिढा सुटला; विधानपरिषद निवडणुकीतील दोन उमेदवारांकडून अर्ज मागे 
9
"मी साधा माणूस, मला देवाकडून कुठलाही आदेश येत नाही"; राहुल गांधींचा पंतप्रधानांना टोला
10
Maratha Reservation : "थोडं सबुरीने घ्या आणि सरकारला वेळ द्या"; मनोज जरांगे पाटलांना केंद्रीय मंत्र्यांची विनंती
11
मुंबईकर सुसाट! कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यात एका दिवसात २०,४५० वाहनांचा प्रवास
12
कुवेतमध्ये इमारतीला भीषण आग; ४१ जणांचा मृत्यू, अनेक भारतीयांचा समावेश
13
घरात फ्रिज आणि भिंतीमध्ये केवढी जागा असावी?; 'ही' चूक केल्यास लवकर खराब होईल कंप्रेसर 
14
T20 World Cup 2024 IND vs USA Live Match : भारत-अमेरिका सामना रद्द झाल्यास पाकिस्तानची नौका बुडणार; पावसाने वाढवली शेजाऱ्यांची धाकधुक 
15
पाकिस्तानी दहशतवाद्याचा दयेचा अर्ज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी फेटाळला, फाशीची शिक्षा कायम
16
इटलीमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना; PM मोदींच्या दौऱ्यापूर्वी खलिस्तान्यांचे कृत्य
17
उद्धव ठाकरेंनंतर नायडूंनी 'करून दाखवलं'; जे लालू यादव, मुलायम यांनाही जमलं नाही
18
अमित शाह व्यासपीठावरच संतापले? माजी राज्यपालांसोबतचे संभाषण व्हायरल; नेमकं काय घडलं
19
'पहला नशा'मध्ये पूजा बेदीचा स्कर्ट उडाला अन् ते पाहून स्पॉट बॉय...; फराह खानने सांगितला किस्सा
20
बापरे! नखांवरून समजतो मोठ्या आजाराचा धोका; 'या' संकेतांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष

ही तर अघाेषित अाणीबाणी : प्रा. अंजली अांबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 9:23 PM

भाजप अाणि अारएसएसच्या विराधी जाणारे मुद्दे यांच्यावरुन लक्ष हटविण्यासाठी दलित, शाेषित, वंचितांच्या बाजूने जे अावाज उठवतायते अशा विचारवंतांना अटक करण्याचे सत्र सध्या चालवले अाहे. असा अाराेप प्रा. अंजली अांबेडकर यांनी केला अाहे.

पुणे : गेल्या महिन्यात सनातन संस्थेशी निगडीत असलेल्या अनेकांना दाभाेलकरांच्या खुनप्रकरणी अटक करण्यात अाली अाहे. तसेच त्यांच्या घरात बाॅम्ब बनविण्याचे साहित्यही सापडले अाहे. त्यामुळे भाजप अाणि अारएसएसच्या विराधी जाणारे मुद्दे यांच्यावरुन लक्ष हटविण्यासाठी दलित, शाेषित, वंचितांच्या बाजूने जे अावाज उठवतायते अशा विचारवंतांना अटक करण्याचे सत्र सध्या चालवले अाहे. यात बनावट पत्रे अाणि खाेटे अाराेप ठेवले जात अाहेत. काेर्टात कुठलाही ठाेस पुरावा देण्यात अालेला नाही, त्यामुळे ही एक प्रकारची अघाेषित अाणीबाणीच असल्याचा अाराेप प्रा. अंजली अांबेडकर यांनी केला. 

     माओवाद्यांशी संबंध असल्याचे सांगत देशभरात विचारवंतांना आणि मानवधिकार कार्यकर्त्यांच्या अटक सत्रांचा निषेध करत पुरोगामी संघटनांकडून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात अाली. त्यावेळी त्या लाेकमतशी बाेलत हाेत्या. कितीही दडपशाही झाली तरी या देशात लाेकशाही अाहे अाणि ही लाेकशाही जिवंत ठेवण्यासाठी अांबेडकरवादी तसेच पुराेगामी विचारांचे लाेक रस्त्यावर उतरुन संघर्ष करतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

    अांबेडकर म्हणाल्या, अनेक अाघाड्यांवर भाजप सरकार अयशस्वी हाेत अाहे. रिझर्व बॅंकेचा नुकताच अालेल्य अहवालानुसार नाेटाबंदी नंतर जवळजवळ 95 टक्क्यांहून अधिक नाेटा परत अाल्या अाहेत. याचा अर्थ नाेटाबंदी केल्याने काळापैसा बाहेर येईल हा भाजपाचा दावा सपशेल खाेटा ठरला अाहे. त्याचबराेबर या नाेटाबंदीमुळे नवीन नाेटा छापण्यासाठी तसेच एटीएम मशीनमध्ये बदल करण्यासाठी लागणाऱ्या पैशांची अाकडेवारी समाेर येत अाहे. एका बाजूला अार्थिक स्तरावरील हे अपयश अाहे. रुपयाची किंमत गडगडतीये. त्यात गेल्या महिन्यात सनातन या हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित अनेक लाेकांना दाभाेलकरांच्या खुनाप्रकरणी तसेच घरात शस्त्रसाठा ठेवल्याप्रकरणी अटक करण्यात अाली अाहे. त्यामुळे भाजप अाणि अारएसएस यांच्या विराेधी जाणाऱ्या मुद्द्यांवरुन लक्ष हटविण्यासाठी हे अटकसत्र चालविले अाहे. 

टॅग्स :PuneपुणेBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारElgar morchaएल्गार मोर्चाnewsबातम्या