शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
3
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
4
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
5
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
6
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
7
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
8
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
9
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
10
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
11
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
12
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
13
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
14
पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा
15
राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल
16
महादेव ॲपशी निगडित १ हजार कोटी शेअर्समध्ये? बनावट कंपन्यांद्वारे गुंतवणुकीचा संशय
17
महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह
18
टेनिस बॉल क्रिकेटमधून शिकलो ‘सुपला शॉट’; सूर्यकुमार यादवने सांगितली आठवण; आपसूक मारला जातो हा फटका
19
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
20
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर

सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करण्याची सवय 'काकां'मुळे लागली : अजित पवार  

By दीपक अविनाश कुलकर्णी | Published: January 29, 2021 3:04 PM

आम्ही जेव्हापासून पाहतोय तेव्हापासून आमचे चुलते वयाच्या २७ व्या वर्षांपासून सकाळी सातला कामाला सुरवात करायचे.

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे सत्तेत असो वा नसो पण आपल्या धडाकेबाज काम करण्याच्या 'स्टाईल'साठी ओळखले जातात. भर कार्यक्रमात पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कान टोचताना आणि ढिसाळ कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना वठणीवर आणताना ते कसलीच कसर सोडत नाही. अजित पवार यांची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे भल्या पहाटेच कामाला सुरुवात करतात. कधी कधी तर ते पहाटेच नियोजित ठिकाणी पोहचलेले देखील असतात. यामुळे मात्र अधिकारी,कर्मचारी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची चांगलीच तारांबळ उडालेली पाहायला मिळाली आहे. मात्र, एवढ्या सकाळी उठून कामाला सुरुवात करण्यापाठीमागचं गुपित अजित पवार यांनी सर्वांसमक्ष जाहीर केले. 

पुणे जिल्ह्यातील खेड येथील एका पेट्रोलपंपाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, आम्ही जेव्हापासून पाहतोय तेव्हापासून आमचे चुलते वयाच्या २७ व्या वर्षांपासून सकाळी सातला कामाला सुरवात करायचे. रात्री कितीही उशिरा आले तरी सकाळी सातला काम सुरु करणार म्हणजे करणार अशी त्यांची पद्धत होती. नुकतेच त्यांनी 80 वर्ष पूर्ण केले. पण आज देखील ते सकाळी सकाळीच कामाला सुरुवात करतात. हे आपण पाहतोच आहोत. त्यामुळे सकाळी लवकर उठण्याची सवय ही मला आजोंबामुळे नव्हे तर काकांमुळे अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेबांमुळे लागली असे जाहीरपणे मान्य केले. 

अजित पवार हे नेहमी स्वतः पहाटे लवकर उठून नियोजित कामाला सुरुवात करतात. त्यामध्ये मग भेटीगाठी, दौरे, बैठका यांसह विविध राजकीय व बिगर राजकीय कार्यक्रमांमधील उपस्थिती ही सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरत असते. सकाळी लवकर उठण्याच्या सवयीवरून अजित पवारांनी आपल्या सहकाऱ्यांचे देखील वेळोवेळी कान टोचलेले सुद्धा निदर्शनास आले आहे. शुक्रवारी त्यांनी सकाळी लवकर उठण्यामागचे कारण व प्रेरणास्थान खुल्या मनाने जाहीर केले. तुमच्यावर संस्कार कसे होतात त्यावर हे अवलंबून असतं. सकाळी सकाळी कामाला सुरुवात केली तर वातावरण सुद्धा प्रसन्न व स्वच्छ असतं. तसेच प्रचंड उत्साह पण असतो. 

राजकारणात यायच्या अजिबात भानगडीत पडू नका; अजित पवारांचा विद्यार्थ्यांना'कानमंत्र' 

 पेट्रोल भरणाऱ्यांना दिल्या 'हटके' शुभेच्छा...  धीरूभाई अंबानी यांनी पेट्रोल पंपावर काम केले आहे. मात्र अफाट कष्टाने त्यांनी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्यापर्यंत मजल मारली. आपल्याला सर्वात श्रीमंत व्हायचे नाही. मात्र पुढे आपले देखील भले होईल अशा 'हटके' शुभेच्छा यावेळी अजित पवार यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या...  

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस