शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

उजनीचा वाद पून्हा पेटला! पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टायर पेटवून निषेध आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 18:18 IST

सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांच्या गाड्या अडवून देणार जशास तसे उत्तर

ठळक मुद्देभाजप नेत्यांकडे २० वर्षे मंत्रीपद असताना देखील २२ गावच्या पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही

बाभुळगाव: उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूरच्या २२ गावांना देण्यासाठीचा निर्णय रद्द केल्याच्या निषेधार्थ आणि दत्तात्रय भरणे यांच्या समर्थनार्थ पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करण्यात आले. पिपल्स रिपब्लिकन पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने इंदापूरच्या पाण्यासाठी विरोध करणार्‍या सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांचा रस्त्यावर टायर पेटवून निषेध नोंदविण्यात आला.

यावेळी बोलताना पिपल्स रिपब्लीकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्राध्यक्ष संजय सोनवणे म्हणाले की, इंदापूच्या पाणी प्रश्नांला विरोध करणार्‍या सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांच्या गाड्या अडवून जशास तसे उत्तर दिले जाईल. तर जिल्ह्यातील भाजपचे रणजितसिंह मोहिते पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील २२ गावच्या पाण्यासाठी पत्र देऊन विरोध दर्शवला. त्यांच्या या निर्णयाचे आम्हाला आश्चर्य वाटत आहे.

इंदापूर तालुक्याचे माजी लोकप्रतिनिधी व सध्याच्या भाजप नेत्यांकडे २० वर्षे मंत्रीपद असताना देखील २२ गावच्या पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही. परंतु दत्तात्रय भरणे यांनी हा प्रश्न मार्गी लावल्याने त्याचे श्रेय भरणे यांना मिळू नये. यासाठी माजी लोकप्रतिनिधी मौन बाळगल्याचा आरोप संजय सोनवणे यांनी यावेळी केला आहे.

उजनी धरणातून लातुर व मराठवाड्यासाठी २१ टीएमसी पाण्याची तरतुद होत असताना सोलापूर जिल्ह्यातील एकाही नेत्याने विरोध केला नाही. परंतु इंदापूर तालुक्याच्या पाच टीएमसी पाण्यासाठीच सोलापूरकरांचा विरोध का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरMLAआमदारDamधरण