शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Ujani Dam: अखेर १०० टक्के भरलं; दौंड मधून १२ हजार क्युसेकनं विसर्ग सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 14:57 IST

राज्यातील दोन नंबरचा जलाशय साठा असलेले उजनी धरण (ujani dam) शंभर टक्के भरल्यामुळे दौंड येथून १२ हजार क्युसेकने विसर्ग येत असल्याने रविवारी (सकाळी ८)वाजल्यापासून धरणाच्या १६ गेटमधून २० हजार क्युसेक पाणी भीमा नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

ठळक मुद्देनदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

कळस : राज्यातील दोन नंबरचा जलाशय साठा असलेले उजनी धरण शंभर टक्के भरल्यामुळे दौंड येथून १२ हजार क्युसेकने विसर्ग येत असल्याने रविवारी (सकाळी ८) वाजल्यापासून धरणाच्या १६ गेटमधून २० हजार क्युसेक पाणी भीमा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

राज्यातील जायकवाडी (jayakwadi dam) नंतर सर्वात मोठी उजनी धरणाची जलाशय क्षमता आहे. १२३ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असलेल्या उजनी धरणात सध्या १२२.४२ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला असून धरण १०९.६८ टक्के भरले आहे. धरणातील उपयुक्त साठाही ५८.७६ टीएमसी (tmc) झाला आहे. दौंड येथून १२२०९ क्युसेक्स विसर्ग चालू आहे. 

उजनीचे १६ दरवाजे उघडण्यात आले असून २० हजार क्‍युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तसेच रविवारी सकाळी १२ वाजता धरणाच्या दहिगांव कालव्यातून ६३ क्युसेक तर मुख्य कालवा १५० क्युसेक पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. धरण पूर्ण क्षमतेत आल्याने व दौंड येथून येणारा विसर्ग वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग कमी-जास्त होईल त्याप्रमाणे निर्णय होईल असे उजनी धरण व्यवस्थापन प्रशासनाने सांगितले. तसेच नदी काठावरील लोकांनाही सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेDamधरणWaterपाणीRainपाऊस