शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

"साहेब खूप घाणेरडा प्रकार होता"; उद्धव ठाकरेंचा वसंत मोरेंना फोन, म्हणाले, "आपला जीव जळतोय पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 14:36 IST

स्वारगेट बसस्थानकात वसंत मोरे यांनी केलेल्या आंदोलनाची उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली

Uddhav Thackeray On Vasant More: पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर दत्तात्रय गाडे नावाच्या आरोपीने शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आरोपी गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आलं आहे. या घटनेनंतर सर्वपक्षीय नेत्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी स्वारगेट बसस्थानकात जाऊन सुरक्षा रक्षकांच्या केबिनची तोडफोड केली होती. त्यानंतर वसंत मोरे यांनी बंद पडलेल्या बसमधील वास्तव समोर आणलं होतं. या सगळ्या प्रकारानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरे यांना फोन करुन या प्रकरणाची दखल घेतली.

स्वारगेट बसस्थानकावरील अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी सर्वच राजकीय संघटना आक्रमक झाल्या आहेत. हा प्रकार समोर आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बसस्थानकात जाऊन आंदोलन केलं. वसंत मोरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वारगेट बस स्थानक परिसरातील सुरक्षा कार्यालयाची तोडफोड केली. त्यानंतर वसंत मोरे यांनी स्वारगेट बस स्थानकातील भयाण वास्तव समोर आणले. वसंत मोरेंच्या आंदोलनानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना फोन करुन त्यांचे कौतुक केले आहे.

वसंत मोरे यांनी एक पोस्ट करत उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या संवादाचा ऑडिओ शेअर केला. "कोण म्हणते मातोश्रीवर कामाची दखल घेतली जात नाही. आंदोलनानंतर अगदी काही तासातच पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊतसाहेब दोघांचीही पाठीवर थाप. आंदोलनात सहभागी सर्व शिवसैनिकांचे महिला रणरागिणींचे अभिनंदन केले आणि जिथे अन्याय दिसेल आणि विशेष महिला भगिनीवर अन्याय होईल तिथे असेच पेटून उठा असा आशीर्वाद, धन्यवाद साहेब..." अशी पोस्ट वसंत मोरेंनी केली.

"जय महाराष्ट्र वसंत, चांगलं केलंत, जोरात केलंत, बोलण्याच्या पलीकडे परिस्थिती आहे. जे आपण लढतोय, कारण आपला जीव जळतोय, महाराष्ट्र कुठे चाललाय, या लोकांना पोलिसांची भीती नाही. चांगलं केलंत तुम्ही, सगळ्यांना धन्यवाद द्या" असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावर वसंत मोरे यांनी, "साहेब खूप घाणेरडा प्रकार होता, एसटीमध्ये लॉजिंग केलं होतं, जाणारी लोकं सुरक्षा कर्मचाऱ्यांसमोरूनच जातात," असं म्हटलं.

दरम्यान, स्वारगेट बसस्थानकातील आंदोलनानंतर बंद पडलेल्या बसेसची परिस्थिती दाखवली. एसटीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कंडोम पडलेले आहेत. याचा अर्थ काय, इथे जो प्रकार घडला आहे, तो इथे रोज होतोय. यामध्ये या कर्मचाऱ्यांचा हात आहे. हे सुरक्षा कर्मचारी काय करतात? असा संतप्त सवाल वसंत मोरे यांनी केला. 

टॅग्स :swargate bus depotस्वारगेट बसस्थानकUddhav Thackerayउद्धव ठाकरेVasant Moreवसंत मोरेPuneपुणे