मोठी बातमी! आमदार उदय सामंतांच्या ताफ्यावर ठाकरे समर्थकांचा हल्ला, कारची काच फोडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 22:17 IST2022-08-02T22:16:10+5:302022-08-02T22:17:15+5:30
पुण्यात उद्धव ठाकरे समर्थक शिवसैनिक आणि शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांचा ताफा कात्रज चौकात समोरासमोर आला. यावेळी ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी 'गद्दार गद्दार' अशी घोषणाबाजी करत उदय सामंत यांच्या ताफ्यावर हल्लाबोल केला.

मोठी बातमी! आमदार उदय सामंतांच्या ताफ्यावर ठाकरे समर्थकांचा हल्ला, कारची काच फोडली
पुणे-
पुण्यात उद्धव ठाकरे समर्थक शिवसैनिक आणि शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांचा ताफा कात्रज चौकात समोरासमोर आला. यावेळी ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी 'गद्दार गद्दार' अशी घोषणाबाजी करत उदय सामंत यांच्या ताफ्यावर हल्लाबोल केला. यात शिवसैनिकांनी पाण्याच्या बाटल्या, चपला आणि दगडफेक करण्यात आली आहे. शिवसैनिकांच्या हल्ल्यात आमदार उदय सामंत यांच्या कारची काच फुटली असून कारमधील सहकारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे पोलिसांनी याप्रकरणी चार शिवसैनिकांना ताब्यात घेतल्याचीही माहिती समोर आली आहे. पुण्यात आज कात्रज परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांचा एकाच वेळी कार्यक्रम होता. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समोरासमोर येऊन तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. तसाच काहीसा प्रकार घडल्याचं पाहायला मिळालं आहे.
VIDEO: आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला, पुण्यात मोठा गदारोळ pic.twitter.com/3G2FHFrOhK
— Lokmat (@lokmat) August 2, 2022
आदित्य ठाकरे आणि उदय सामंत यांचा ताफा कात्रज चौकात आला होता. यावेळी जमलेल्या शिवसैनिकांनी उदय सामंत यांचा ताफा पाहताच घोषणाबाजी आणि निदर्शनं करण्यास सुरुवात केली. गर्दी आवरताना पुणे पोलिसांची दमछाक होताना पाहायला मिळाली. गर्दी इतकी होती की पोलिसांनाही गर्दी आवरणं शक्य होत नव्हतं. शिवसैनिकांनी उदय सामंत यांच्या कारपुढेच गर्दी केली. यात रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, चपला आणि दगडफेक कारवर केली गेली. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. दरम्यान, उदय सामंत यांचा ताफा यानंतर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या दिशेनं गेल्याची माहिती समोर आली आहे. तसंच घडलेल्या प्रकाराची पुणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.