एकनाथ शिंदेंना पुणे जिल्ह्यात २ दिवसात दुसऱ्यांदा लॉटरी; ठाकरे गटाच्या सुलभा उबाळे शिवसेनेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 16:51 IST2025-03-12T16:48:55+5:302025-03-12T16:51:19+5:30
पक्षनेतृत्व शहराकडे लक्ष देत नसल्याने काम करण्यास थोडी सुद्धा संधी शिल्लक नाही, त्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे

एकनाथ शिंदेंना पुणे जिल्ह्यात २ दिवसात दुसऱ्यांदा लॉटरी; ठाकरे गटाच्या सुलभा उबाळे शिवसेनेत
पुणे: रवींद्र धंगेकर यांच्यानंतर पिंपरी चिंचवड मधील फायर ब्रँड नेत्या शिवसेनेच्या गळाला लागल्या आहेत. ठाकरे गटाच्या जिल्हा संघटक सुलभा उबाळे आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
शहरातील तीनही मतदार संघ पक्षाने सोडून दिल्यामुळे शहरात पक्षाचे अस्तित्वचं शिल्लक नाही. पक्षनेतृत्व शहराकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे काम करण्यास थोडी सुद्धा संधी शिल्लक नाही. त्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आज संध्याकाळी शिवसेनेत प्रवेश करणार आहे, सुलभाव उबाळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुलभा उबाळे यांची राजकीय कारकीर्द
- 1992 शिवसेना शाखा प्रमुख म्हणून कामाला सुरुवात
- 1997 साली नगरसेवक
- 1998 साली विरोधी पक्षनेता
- 1999 उप सभापती
- 2001 अ प्रभाग समिती,
- 2007 ते 2012 शिवसेना गटनेता, स्थायी समिती सदस्य
- 2009 साली भोसरी विधानसभा निवडणुकीत अवघ्या 1272 मतांनी पराभव
- 2014 ते 2017 गटनेता
- 2014 पुन्हा भोसरी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी 15, 641 मतांनी पराभव
- शिवसेना महिला आघाडी उप जिल्हा संघटिका
- शिवसेना शहर संघटिका पिंपरी चिंचवड म्हणून 5 वर्ष काम पाहिल
- जिल्हा संघटिका म्हणून 2017 ते आजतगायत कार्यरत होत्या
- अध्यक्ष पिंपरी चिंचवड महिला बचत गट महासंघ
दरम्यान माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनीसुद्धा शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. महाविकास आघाडीतून बरेच पदाधिकारी महायुतीत येण्याच्या प्रयत्नात आहेत. आमदारकीला झालेल्या पराभवानंतर महायुतीत इनकमिंग सुरु झाली आहे. काहींची पक्षावर नाराजी, तर काहींना पाकशातून डावललं गेल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. आता उबाळे यांनी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे. महाविकास आघाडीचे नेते पदाधिकाऱ्यांना थांबवण्यासाठी प्रयत्न करणार का? अजून किती पदाधिकारी महायुतीत जाणार? यामागची न नेमकी कारण काय आहेत? असे अनेक सवाल आता उपस्थित होऊ लागले आहेत.