शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी एकत्रित गटाला खंजीर चिन्ह दिले पाहिजे; आमदार गोपीचंद पडळकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 18:53 IST

मी निवडणूक आयोगाला पत्र लिहीन की राष्ट्रवादी चे चिन्ह गोठवून सेना आणि राष्ट्रवादीला याला खंजीर चिन्ह द्या

बारामती : शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी एकत्रित करून त्यांना खंजीर चिन्ह दिले पाहिजे होते. मशाल आता रुजवायला वेळ लागेल, पण खंजीर म्हटलं तर लोकांच्या लक्षात येईल. कारण राष्ट्रवादीचा हा जन्मच खंजिरातून झालेला आहे. आता नवा एक खंजीर घुसवणारा निर्माण पवारांनी केलेला आहे. मी निवडणूक आयोगाला पत्र लिहीन की राष्ट्रवादी चे चिन्ह गोठवून सेना आणि राष्ट्रवादीला याला खंजीर चिन्ह द्या. फक्त ते एकमेकांत घुसवू नका, अशी जहरी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. बारामती येथे पत्रकारांशी बोलताना पडळकर यांनी ही टीका केली.

यावेळी पडळकर पुढे म्हणाले, एक राजा होता, त्याचा हात लागला तर कुठल्याही वस्तूचं सोनं होतं. अस मी ऐकलं होतं. बारामतीच्या तथाकथित जाणता राजाचा हात लागला तर राख होते, हे आता मी प्रत्यक्षात बघितलं. राष्ट्रवादीच्या नादाला जो जो लागेल त्याची राख होते. आता शिवसेनेत झाली आहे, अशी  टीका देखील पडळकर यांनी केली.

राज्यामध्ये कर्मचारी आणि असंघटित कर्मचारी यांची संख्या करोडोच्या घरात आहे.  या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका घेऊन काही लोकांनी अनेक संघटना केल्या. कर्मचाऱ्यांना न्याय न देता कर्मचाऱ्यांचा फक्त आणि फक्त राजकारणासाठी वापर करून घेतला. त्या कर्मचाऱ्यांचे शोषण केल. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली संघटना काम करीत होत्या. पंरतु त्यांना न्याय मिळाला नाही. कर्मचाऱ्यांच्या आग्रहाखातर सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी ही संघटना उभी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतनाप्रमाणे पगार मिळाला पाहिजे. राज्य सरकारच्या कर्मचाºयाला मिळतो ते एसटी कर्मचाऱ्याला’ हा महत्त्वाचा मुद्दा कर्मचाऱ्यांचा आहे. तो मुद्दा आम्ही सरकारकडे लावून धरणार असल्याचे पडळकर म्हणाले. यावेळी भाजप भटके विमुक्त आघाडी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गजानन वाकसे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष गोविंद देवकाते आदी उपस्थित होते.

...ते दोघे एकत्रित निर्णय घेतील

राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर हे बारामती लोकसभा निवडणुक लढविणार असल्याची घोषणा ‘रासप’ पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबत पडळकर म्हणाले, ते एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.‘रासप’ हा ‘भाजप’ बरोबर आहे. घटक पक्षाबाबत निर्णय सांगु शकेल,एवढा मोठा मी नेता नाही.  महादेव जानकर साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे सगळे एकत्रित बसून त्याचा निर्णय घेतील,असे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. 

टॅग्स :BaramatiबारामतीGopichand Padalkarगोपीचंद पडळकरNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेSocialसामाजिकPoliticsराजकारण