शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

उद्धवसेनेला पुण्यात मोठा धक्का, पाच माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

By राजू हिंगे | Updated: January 7, 2025 20:26 IST

पाचजण शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती

पुणे - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धवसेनेच्या पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये मुंबईत प्रवेश केला आहे. त्यामुळे उद्धवसेनेला पुण्यात मोठा धक्का बसला आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्यामध्ये विशाल धनवडे, बाळा ओसवाल हे दोन माजी नगरसेवक आणि पल्लवी जावळे, संगीता ठोसर, प्राची आल्हाट या तीन माजी नगरसेविकांचा समावेश आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, प्रभारी आमदार रवींद्र चव्हाण, सुनील कांबळे , राजेश पांडे , भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे आदी उपस्थित होते. उद्धव सेनेच्या वरिष्ठांकडून पक्ष वाढीसाठी कोणतेही निर्णय घेतले जात नाही असा आरोप करून यातील माजी नगरसेवकांनी पक्ष सोडत असल्याचे गेल्या आठवड्यात जाहीर केले होते. सोशल मीडिया अकाउंट वरून या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर दोन दिवसांमध्येच यातील तीन नगरसेवकांना पक्षातून बडतर्फ केल्याचे शिवसेना ठाकरे पक्षाने जाहीर केले होते.शिवसेनेत तीन वर्षांपूर्वी पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देऊन आठ माजी नगरसेवकांनी शिवसेना (ठाकरे) पक्षात राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यातील पाचजण शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. अखेर आज पाच माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश झाला.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या मार्गावर या सर्वांनी मार्गक्रमण केले याचा मनस्वी आनंद आहे. भारतीय जनता पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. तो समर्पित कार्यकर्त्यांनी केलेल्या अथक परिश्रमांमुळे आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या ध्येयधोरणे समाजापर्यंत पोहोचवावी. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, भाजपचा मोठा परिवार आहे. या कुटुंबात नवीन सदस्यांचे सहर्ष स्वागत करतो. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले नव्या जुन्यांची सांगड घालून पक्ष वाढीसाठी तुम्ही प्रयत्न कराल ही अपेक्षा आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाmurlidhar moholमुरलीधर मोहोळChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेchandrakant patilचंद्रकांत पाटील