उदयनराजेही नॉट रिचेबल ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 21:17 IST2019-09-09T21:15:38+5:302019-09-09T21:17:38+5:30
ते पुण्यात कार्यकर्त्यांबरोबर बैठक घेणार असे वृत्त सातारा येथील एका स्थानिक दैनिकाने दिले होते, मात्र तशी बैठक वगैरे काहीच झाली नाही.

उदयनराजेही नॉट रिचेबल ?
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार अशी चर्चा असलेले खासदार उदयनराजे सोमवारी दुपारी पुण्यात आले, निवडक कार्यकर्त्यांबरोबर बोलले मात्र त्यानंतर ते नॉट रिचेबल झाले. ते पुण्यात कार्यकर्त्यांबरोबर बैठक घेणार असे वृत्त सातारा येथील एका स्थानिक दैनिकाने दिले होते, मात्र तशी बैठक वगैरे काहीच झाली नाही.
त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की बैठक घेणार, ती रद्द झाली ही माहिती निराधार आहे. काही घरगुती कामासाठी म्हणून उदयनराजे पुण्यात आले होते. त्यांनी काही मोजक्याच कार्यकर्त्यांबरोबर राजकारणाशिवायच्या अन्य कामांची चर्चा केली. ते मुंबईला गेल्याची चर्चाही निराधार असून पुण्यातच आहेत अशीही माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. ते फोनवर उपलब्ध होणार नाहीत असे सांगण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार असलेले उदयनराजे कायम चर्चेत असणारे व्यक्तीमत्व आहे. गेले काही दिवस ते राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपात जाणार अशी चर्चा आहे. त्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला असेही बोलले जात आहे. मात्र त्याला दूजोरा मिळालेला नाही. स्वत: उदयनराजेंनीही याचा अद्याप काही खुलासा केलेला नाही.