खेड घाटात नवीन महामार्गावर दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक; २ जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 16:14 IST2021-02-01T16:12:09+5:302021-02-01T16:14:36+5:30
रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक होऊन गंभीररित्या जखमी झाले.

खेड घाटात नवीन महामार्गावर दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक; २ जण ठार
राजगुरुनगर: खेड घाटात नवीन महामार्गावर दोन दुचाकीस्वाराची समोरासमोर जोरदार धडक दोन युवकांचा मूत्यू झाला असुन एक जण जखमी गंभीर झाला आहे. ही घटना (३१ जाने ) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. विकास गोकुळ जगताप (वय २२, सध्या रा. संतोषनगर भाम, ता. खेड, मुळगाव; कानडीघाट, बीड ) व युवराज लुमा दिघे (सध्या रा. चाकण, ता. खेड, मुळगाव सातेवाडी, ता अकोले, जि. अहमदनगर) अशी अपघातात मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खेड घाटातील बाह्यवळण रस्त्याचे काम अपूर्ण आहे. घाटातील एका लेन लगत धोकादायक दरडी काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्याची एक लेन पूर्णपणे बंद आहे. एक लेन सुरु असल्याने जाणारी व येणारी वाहने या रस्त्याचा वापर करुन सुसाट वेगाने धावत असतात. रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक होऊन गंभीररित्या जखमी झाले. त्यांना खाजगी रुग्णवाहिकेतुन रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी दोघांनी मृत घोषित केले. या अपघातात महेंद्र मच्छिंद्र जारकड ( रा. अवसरी, ता आंबेगाव ) हा जखमी झाला आहे. घटनास्थळी अजुन एक अपघातग्रस्त चारचाकी वाहन उभे होते. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वर्षाराणी घाटे करत आहे