शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कारच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 17:56 IST

इंदापूर तालुकयातील पळसदेव येथील घटना

ठळक मुद्देडॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता मृत्यू झाल्याचे समोर आले.

बाभुळगाव: इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कारची जोरात धडक बसून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.  पळसदेव येथून पुण्याला जात असताना ही अपघाताची घटना घडली. संजय शामराव येडे (वय४८ रा.पळसदेव, इंदापूर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अशी माहिती इंदापूर पोलिसांनी दिली आहे. 

मंगळवार सकाळी ९:१० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून याबाबत विशाल महादेव येडे (वय२८ रा.पळसदेव, इंदापूर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मंगळवारी सकाळी संजय शामराव येडे हे त्यांच्या मोटारसायकलवरून पळसदेव येथून पुण्याकडे जात होते. येडे वस्ती येथे बसस्टॉप जवळ त्यांच्या दुचाकीला कारने धडक दिल्याने हा अपघात घडला. विशाल येडे हे अपघाताच्या ठिकाणापासून १०० मीटर अंतरावर असल्याने त्यांनी अपघात घडल्याचे पाहिले होते. ते तात्काळ घटनास्थळी गेले असता या घटनेत जखमी झालेला व्यक्ती त्यांचा चुलता असल्याचे निष्पन्न झाले. त्याच क्षणी खासगी वाहनाने संजय येडे यांना उपजिल्हा रूग्णालय इंदापूर येथे उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता संजय येडे यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. संजय येडे यांच्या अपघातास कारणीभूत कारचालकाविरोधात विरूद्ध इंदापूर पोलिसांत फिर्याद दिली असून पुढील तपास ते करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीIndapurइंदापूरDeathमृत्यूbikeबाईकAccidentअपघात