शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर समोरासमोर धडक झाल्याने दुचाकींचा अपघात, दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 19:45 IST

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक होवून अपघाताची घटना घडली.

कळस :पळसदेव (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दोन तरुण मृत्युमुखी पडल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. निखील भारत लावंड (वय १७) व साहिल अनिल भोसले (वय १८, दोघे रा. रुई, ता. इंदापूर) या तरुणांना अपघातात आपला प्राण गमवावा लागला. पळसदेव येथून संगणक प्रशिक्षणाचा तास संपल्यानंतर हे दुचाकीवरून आपल्या घरी परतत होते. या दुर्घटनेमुळे रुई गावावर शोककळा पसरली. इंदापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुई येथील निखील भारत लावंड, साहिल अनिल भोसले, जयदीप संदिपान लावंड (वय १७) हे पळसदेव येथून संगणक प्रशिक्षणाचा क्लास संपल्यानंतर मोटारसायकलवरून (क्रमांक एमएच ४२/एल ४०८५) घराकडे परतत होते. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास भगवान महादेव काळे (वय - ४०, रा. काळेवाडी) हे मोटारसायकलवरून (क्र. एमएच १२/६११५) हे पळसदेव गावच्या दिशेने जात होते. दरम्यान या दोन्ही मोटारसायकलस्वारांची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात भगवान काळे यांच्यासह निखील लावंड व साहिल भोसले हे गंभीर जखमी झाले. तर जयदीप लावंड हा किरकोळ जखमी झाला. अपघातग्रस्तांना ग्रामस्थांनी तातडीने रुग्णवाहिकेतून अकलूज येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. दरम्यान इंदापूर येथील बायपास रस्त्याजवळ निखीलची प्राणज्योत मालवली. यानंतर त्याला इंदापूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर अकलूज येथे उपचार सुरू असताना दुपारी साहील भोसले याची प्राणज्योत मालवली. साहिलवर आज पाच वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास इंदापूर पोलिस करत आहेत.या दोघांनीही दहावीची परिक्षा दिली आहे.उन्हाळ्याच्या सुट्टीतील वेळ संगणक प्रशिक्षण घेण्यासाठी खर्च करण्याचे त्यांचे नियोजन होते. परंतू  काळाने तत्पुर्वी त्यांच्यावर झडप घातली.दुर्घटनेने त्यांच्या कुटुंबियांवर दु:खचा डोंगर कोसळला. गावातील बाजारपेठ, दुकाने बंद ठेवून ग्रामस्थ या दु:खात सहभागी झाले होते.  

टॅग्स :IndapurइंदापूरAccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यू