शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

उरुळी कांचनमध्ये स्वाइन फ्लूचे दोन बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 02:19 IST

आरोग्याचा प्रश्न गंभीर; तत्काळ उपाययोजनांची आवश्यकता

उरुळी कांचन : पुणे शहरासह जिल्ह्यामध्येही स्वाइन फ्लूचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला असून, उरुळी कांचनमध्ये या आजारामुळे एका परिचारिकेसह दोन महिलांना जीव गमवावा लागला आहे. नुकताच चाकण परिसरातही स्वाइन फ्लूमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.सीमा चंद्रकांत ऐवारे (वय ३८, रा. तुपेवस्ती, उरुळी कांचन), प्रभावती वाल्मीक कांचन (वय ६०, रा. काळेशिवार, शिंदवणे) अशी मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावे आहेत. ऐवारे या स्वत: परिचारिका म्हणून काम करीत होत्या. त्यांच्या रक्ताच्या नमुन्याची तपासणी केली असता ती एच१एन१ पॉझिटिव्ह आली. त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयामध्ये हलविण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून त्या व्हेन्टिलेटरवर होत्या. शनिवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यामागे पती, दोन मुले आहेत. तर, कांचन या पती वाल्मीक कांचन यांची सुश्रुषा करण्यासाठी हडपसरच्या एका खासगी रुग्णालयात होत्या. त्यांना तेथे स्वाइन फ्लूचा संसर्ग झाला. उपचारादरम्यान त्यांचा बुधवारी (दि. १२) मृत्यू झाला.स्वाइन फ्लू, डेंग्यू, चिकुनगुनिया व अन्य साथींच्या रोगांनी उरुळी कांचन परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शासन यंत्रणा यावर गांभीर्याने उपाययोजना करण्यास प्राधान्य देताना दिसत नाही. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. ग्रामविकास अधिकारी के. जी. कोळी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले, की डुक्करमालकांना अनेकदा सांगूनही ते त्याचा बंदोबस्त करीत नाहीत. वरिष्ठ कार्यालयाचे मार्गदर्शन घेऊन कारवाई करण्यात येईल.

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लूDeathमृत्यू