शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमात दोन हजार पोलिसांचे संचलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 15:49 IST

कोरेगाव भीमा परिसरात १ जानेवारी २०१८ ला झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर मोठा फौजफाटा तैनात..

ठळक मुद्देसुरक्षेचा घेतला आढावा : हातात बंदूक, काठ्या घेत शिस्तीचे दर्शन, गावातून फेरी विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रासह विविध राज्यांतून अलोट गर्दी

कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा परिसरात १ जानेवारी २०१८ ला झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी परिसरात मोठा फौजफाटा लावला असतानाच रविवारी पुणे-नगर महामार्गावरून दोन हजार पोलिसांनी संचलन करीत सुरक्षेचा आढावा घेतला. या वेळी कोरेगाव भीमा गावातूनही संचलन करण्यात आले. या वेळी अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी पोलीस सर्व बाजूंनी सतर्क असून, गतवर्षीप्रमाणे या वर्षीही मानवंदना कार्यक्रम शांततेत साजरा होणार असल्याचे सांगितले. कोरेगाव भीमा परिसरात १ व २ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर या वर्षी प्रशासनाने कमालीची सतर्कता बाळगली आहे. कोरेगाव भीमामध्येच दोन हजारांपेक्षा जास्त पोलीस फौजफाटा, राज्य राखीव दलाच्या ८ तुकड्या तैनात आहेत. गावांमधून सामाजिक सलोखा जपण्यासाठी प्रत्येक चौकात, वस्तीवर एक अधिकारी, १० कर्मचारी तैनात असणार आहेत. गावातील प्रत्येक उपनगराला बॅरिकेडिंग करण्यात येणार असून, कोरेगाव भीमा, पेरणे व वढू बुद्रुक या ठिकाणी २९ डिसेंबरपासूनच ५ हजारांपेक्षा जास्त पोलीस बंदोबस्त दिला आहे. या पोलिसांचे गावोगाव संचलन कालपासून सुरू करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या सूचनेप्रमाणे घेण्यात आलेल्या या संचलनामध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा, आँचल दलाल, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्यासह ५ पोलीस निरीक्षक, १० पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, ८०० जिल्हा पोलीस, ४०० होमगार्ड व राज्य राखीव पोलीस दलाच्या आठ तुकड्यांमधील जवान, तसेच कोरेगाव भीमाच्या सरपंच संगीता कांबळे, पोलीस पाटील मालन गव्हाणे पाटील आदी सहभागी झाले होते.....वाहतूककोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गभीमाकाठावरील कोरेगाव भीमानजीक ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी विविध पक्ष, संघटना व मान्यवरांसह महाराष्ट्रासह विविध राज्यांतून लाखो आंबेडकरी बांधवांची अलोट गर्दी होत असते. मात्र गतवर्षीच्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे-नगर रस्त्यावर गर्दीमुळे चारही बाजूंनी येणारी वाहतूक ३१ डिसेंबर रात्री १२ ते १ जानेवारी रात्री १२ पर्यंत लोणी कंद व शिक्रापूर पोलिसांनी शिक्रापूर व खराडी बायपास येथून वळविण्यात आली आहे.......पुणे- नगर महामार्गावरील कोरेगाव भीमाजवळील पेरणे फाटा येथे विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून आलेल्या आंबेडकरी बांधवांच्या वाहनासह या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत असते. ही वाहतूककोंडी टाळण्यासाठी मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ व ११७ नुसार दि. १ रोजी रात्री १२ वाजल्यापासून रात्री १२ पर्यंत पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याच्या सूचना पोलिसांना परिसरात सुरक्षेच्या कारणाास्तव  कोरेगाव भीमा व पेरणे परिसरातील प्रत्येक भागाची नवी मुंबई बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी केली जात असून दोन दिवस या पथकाकडून परिसराची तपासणी होणार आहे. 2- १ जानेवारी मानवंदनेसाठी येणाºया समाजबांधवांच्या व स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेची मोठी जबाबदारी पोलीस प्रशासनावर असल्याने गेले दोन पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कोरेगाव भीमा व पेरणे परिसराची बॉम्बशोधक पथकाच्या वतीने कसून तपासणी केली जात आहे. 3- प्रत्येक पथकात १ अधिकारी, ७ कर्मचारी व एका श्वानाच्या मदतीने तपासणी करीत आहेत. या पथकांमध्ये नवी मुंबई, पुणे ग्रामीण, पुणे शहर, रेल्वेसह सातारा, सांगली येथील बॉम्बशोधक पथकाने कोरेगाव भीमा, पेरणे, वढू बुद्रुकसह परिसरातील वाड्या-वस्त्या गावठाण यांसह शिक्रापूर व लोणी कंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहनतळांची तपासणी केली.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारPoliceपोलिस