Suicide: खेड तालुक्यात दोन जेष्ठ नागरिकांची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 19:15 IST2022-03-07T19:15:16+5:302022-03-07T19:15:55+5:30
खेड तालुक्यात दोन जणांनी अज्ञात कारणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे

Suicide: खेड तालुक्यात दोन जेष्ठ नागरिकांची गळफास घेऊन आत्महत्या
राजगुरुनगर : खेड तालुक्यात दोन जणांनी अज्ञात कारणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शांताराम गोविंद शेवाळे (वय ७२ रा. वाकळवाडी ता.खेड ) व काळुराम बबन जाधव ( वय ५० वर्षे मुऴ रा.दोंदे,सैदाने ठाकरवाडी, ता. खेड,सध्या रा.वाघमारे वस्ती शिरोली ता.खेड ) असे आत्महत्या केलेल्यांची नांवे आहेत.
याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकळवाडी ता खेड येथील शांताराम शेवाळे यांनी शेतामधील बाबळीच्या झाडाला यांनी सुती दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेबाबत मुलगा गणेश शांताराम शेवाळे यांने खेड पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. तसेच शिरोली (ता खेड ) येथे काळुराम बबन जाधव यांनी घराचे शेजारी असलेल्या शेवग्याच्या झाडाला नायलाँनच्या दोरीने गऴफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेबाबत जाधव यांच्या पत्नी ललीता काळुराम जाधव यांनी पोलिस ठाण्यात खबर दिली असून पुढील तपास खेड पोलीस करत आहे.