कोयत्याने दुचाकीची तोडफोड करून दोघांना मारहाण, दोन जणांना अटक; बोपखेल येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 18:53 IST2021-06-26T18:51:55+5:302021-06-26T18:53:43+5:30

हातात कोयता फिरवत जात असलेल्या दुचाकीस्वारांकडे पाहिल्याच्या रागातून हॉटेल चालकासह दोघांना मारहाण केली.

Two person were arrested in a beaten and vandalizing a two-wheeler by weopan ; Incident at Bopkhel | कोयत्याने दुचाकीची तोडफोड करून दोघांना मारहाण, दोन जणांना अटक; बोपखेल येथील घटना

कोयत्याने दुचाकीची तोडफोड करून दोघांना मारहाण, दोन जणांना अटक; बोपखेल येथील घटना

पिंपरी : हातात कोयता फिरवत जात असलेल्या दुचाकीस्वारांकडे पाहिल्याच्या रागातून हॉटेल चालकासह दोघांना मारहाण केली. तसेच कोयत्याने दुचाकीचीही तोडफोड केली. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. बोपखेल येथे गुरुवारी (दि. २४) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.

दिवाकर सुरेंद्र सिंग (वय २३, रा. परांडे नगर, दिघी) आणि खंदेश्वर उर्फ सोन्या शिवाजी तांबे (वय २०, रा. गणेश नगर, बोपखेल), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. स्वप्निल बळीराम श्रीभगत (वय २३, रा. रामनगर, बोपखेल) यांनी शुक्रवारी (दि. २५) रोजी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वप्नील आणि त्यांचा मित्र आकाश अभिमन्यू वाघमारे हे दोघेजण फिर्यादीच्या विशाखा चायनीज सेंटरच्या बाहेर उभे होते. त्यावेळेस त्यांच्या वस्तीमध्ये राहणारे दोन तरुण दुचाकीवरून हातामध्ये लोखंडी कोयता फिरवून रस्त्याने जात होते. त्यांनी फिर्यादीला पाहिल्यानंतर फिर्यादी स्वप्नील आणि त्यांचा मित्र आरोपींकडे बघत असल्याचा राग त्यांना आला. यामुळे संतापलेल्या आरोपींनी शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. यामुळे घाबरलेले फिर्यादी हॉटेलमध्ये पळून गेले. तुम्हाला जास्त मस्ती आली काय?, असे म्हणत आरोपींनी त्यांच्या हातातील लाकडी फळीने फिर्यादीच्या हातावर मारून जखमी केले. आरोपी दिवाकरने फिर्यादीच्या अंगावर कोयता उगारला. तुझा आत्ताच मर्डर करून टाकेल, अशी धमकीही आरोपी दिवाकरने फिर्यादीला दिली. तसेच त्यानंतर कोयत्याने फिर्यादीच्या दुचाकीवर कोयत्याने मारून पाच हजार रुपयांचे नुकसानही केले.

पोलीस उपनिरीक्षक आर. बी. भंडारे याबाबत तपास करीत आहेत.

Web Title: Two person were arrested in a beaten and vandalizing a two-wheeler by weopan ; Incident at Bopkhel