द्रुतगती मार्गावर अपघातात दोन जणांचा मृत्यू , सहा जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 18:47 IST2018-05-09T18:45:23+5:302018-05-09T18:47:50+5:30
मैत्रिणीच्या लग्नासाठी निघालेल्या गाडीला कामशेत येथे अपघात घडला.

द्रुतगती मार्गावर अपघातात दोन जणांचा मृत्यू , सहा जण जखमी
कामशेत : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर जलदगतीने जाणाऱ्या वाहनवरील नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून सहाजण जखमी झाले आहेत . मुंबई येथून पुण्याकडे मैत्रिणीच्या लग्नाला जाणाऱ्या तीन मुले व पाच मुली असणाऱ्या गाडीला अपघात झाला. बुधवार ( दि . ९ ) रोजी दुपारी २:३० च्या सुमारास मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर कामशेत हद्दीत हा अपघधात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्ला येथून सिद्धेश बेहडे याच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी निघालेल्या मित्र मैत्रिणींच्या गाडीला कामशेत येथे अपघात घडला. बुधवारी दुपारी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर कामशेत हद्दीत कामशेत बोगदा न २ च्या पुढे किलोमीटर न ७२/ ३०० येथे मुंबई वरून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या इर्टिका(क्र- एम एच ०३ सी बी ८६८४ ) या कारवरील चालक अक्षय याचा अतिवेगामुळे ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या चारीत धडकून अपघात झाला. यात सिद्धेश बेहडे, निखिल राव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर चालक अक्षय चव्हाण, रुपेश जाधव, वैभवी सिधारीक, जयश्री राठोड, नीता चिवलेकर व आणखी एक ( नाव समजू शकले नाही ) हे जखमी झाले असून त्यांच्यावर सोमाटणे येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे अशी माहिती पोलीस नाईक वैभव सपकाळ यांनी दिली.