खुनाच्या दोन घटनांनी पुणे हादरले, दत्तवाडीत तरुणाचा तर हडपसरला रिक्षा चालकाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 09:37 AM2021-10-19T09:37:05+5:302021-10-19T09:37:58+5:30

दुसऱ्या घटनेत हडपसरच्या 15 नंबरजवळ प्रदीप शिवाजी गवळी (वय 26) या रिक्षाचालकाचा खून करण्यात आला. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला

two murders in pune city dattawadi hadapsar crime news | खुनाच्या दोन घटनांनी पुणे हादरले, दत्तवाडीत तरुणाचा तर हडपसरला रिक्षा चालकाचा खून

खुनाच्या दोन घटनांनी पुणे हादरले, दत्तवाडीत तरुणाचा तर हडपसरला रिक्षा चालकाचा खून

Next

पुणे: दोन खुनाच्या घटनांनी पुणे शहर हादरले आहे. दत्तवाडी आणि हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी रात्रीतून दोघांचे खून करण्यात आले आहेत. सिंहगड रस्त्यावरील नवश्या मारुती चौकात मंदार जोगदंड (वय 23) या तरुणाचा तर हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रदीप शिवाजी गवळी (वय 26) या तरुणाचा खून करण्यात आला. 

मंदार जोगदंड खुनप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. मंदार हा स्मशानभूमीत काम करतो. त्याच्यावर अवैध दारुबाबत दोन आणि मारहाण केल्याचा एक असे तीन गुन्हे दाखल आहेत. पूर्वी तो एका दारु अड्ड्यावर काम करत होता. याठिकाणी असलेल्या काही तरुणांसोबत त्याची ओळख झाली होती. रात्री दारू पिल्यानंतर त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर चार जणांनी मिळून भर रस्त्यात मंदार जोगदंड याचा खून केला. दत्तवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांना ताब्यात घेतले तर एक जण फरार आहे. यातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत. दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

दुसऱ्या घटनेत हडपसरच्या 15 नंबरजवळ प्रदीप शिवाजी गवळी (वय 26) या रिक्षाचालकाचा खून करण्यात आला. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला. माहिती मिळाल्यानंतर हडपसर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा खून कोणी आणि का केला याचे कारण अद्याप समोर आले नाही. हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Web Title: two murders in pune city dattawadi hadapsar crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app