एटीएम कार्ड क्लोनिंग करुन पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना नाशिकमधून अटक; २५० तक्रारी होत्या आल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 08:27 PM2020-12-10T20:27:41+5:302020-12-10T20:28:20+5:30

पुणे सायबर पोलीस ठाण्यात अनेक नागरिकांचे बँकेतील पैसे त्यांचे एटीएम डेबिट कार्ड क्लोन करून अन्य जिल्ह्यांच्या एटीएम सेंटरवरून पैसे काढले जात असल्याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या.

Two members of ATM card cloning gang arrested from Nashik; There were 250 complaints | एटीएम कार्ड क्लोनिंग करुन पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना नाशिकमधून अटक; २५० तक्रारी होत्या आल्या

एटीएम कार्ड क्लोनिंग करुन पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना नाशिकमधून अटक; २५० तक्रारी होत्या आल्या

Next

पुणे : एटीएम कार्ड क्लोनिंग करुन बनावट कार्डद्वारे पैसे काढणार्या आंतरजिल्हा टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी नाशिक येथून अटक केली. पुण्यातील लोकांचे एटीएम कार्ड क्लोन करुन नाशिकमधील एटीएम सेंटरमधून १ लाख रुपये काढण्यात आले होते.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली.

मोहम्मद अकिल आदिल भोरनिया (वय ३७) , मोहम्मद फैजान फारुख छत्रीवला (वय ३७, दोघे रा.डोंगरी, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. मोहम्मद फैजन फारुख छत्रीवाला याने त्याच्या साथीदारासह मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, हिमाचल प्रदेश, हैदराबाद, गुजरात याठिकाणी गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच तो मागील ३ वर्षापासून मुंब्रा पोलिस ठाण्याच्या गुन्ह्यात फरार आहे. हा गुन्हा केल्यानंतर तो नेपाळ मार्गे २ वर्षे दुबई मध्ये पळून गेला. तो डिसेंबर २०१९ मध्ये भारतात परतला होता.

पुणे सायबर पोलीस ठाण्यात अनेक नागरिकांचे बँकेतील पैसे त्यांचे एटीएम डेबिट कार्ड क्लोन करून अन्य जिल्ह्यांच्या एटीएम सेंटरवरून पैसे काढले जात असल्याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या. यादृष्टीने पोलिसांनी तपास करत दोघांना जेरबंद करून त्यांच्या ताब्यातून ३५९ बनावट तयार केलेले एटीएम कार्ड, १३ एटीएम स्कीमर डिव्हाईस, १२ डिजिटल मायक्रो कॅमेरा, २ वॉकी टॉकी, चार्जर, हेडफोन, १५ मायक्रो बॅटरी आणि त्याचे मॅकनिझम, ५० डाटा केबल, ४ लॅपटॉप चार्जर, डाटा केबल, ११ सॉफ्टवेअर मायक्रो सीडीज, ११ स्कीमर लावण्याच्या लहान बॅटरीज, एक मोबाईल, ४ इलेक्ट्रॉनिक सर्किट, ९ सर्किट बॅटरी, एक बनावट एटीएम कार्ड प्रिंट करण्याकरिता लागणारा कलर प्रिंटर असा माल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी डेनिस मायकल (वय ३२, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. मायकल यांच्या खात्यातून ३० नोव्हेंबर २० रोजी नाशिक येथील एटीएम सेंटर वरून १० ट्रानझाक्शन करून १ लाख रुपये काढण्यात आले. याबाबत सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. अशाप्रकारचे 2२०० ते २२५ गुन्हे पोलिसांकडे आल्याने त्याबाबत तक्रारींचे विश्लेषण करून आरोपींचा माग काढला असता ते नाशिक येथे असल्याचे समजले.

त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक अनिल डफळ यांचे पथक नाशिकला जाऊन त्यांनी आरोपी ताब्यात घेतले. सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, उपआयुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांच्या पथकातील उपनिरीक्षक अमित गोरे, संदेश कर्णे, अस्लम अत्तार, शिरीष गावडे, नितीन चांदणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

.........

नायजेरियन आरोपी गजाआड
पुण्यातील हडपसर भागात सातवनगर येथे आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम मध्ये स्कीमर आणि पिन होल कॅमेरा लावून ग्राहकांची डेबिट कार्ड माहिती आणि पिन क्रमांक चोरी करण्याचा प्रयत्न एका आरोपीने बुधवारी सायंकाळी आठ वाजता केला. पण, बँकेच्या सीसीटीव्ही मध्ये ही घटना कैद झाली आणि बँकेने ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्यानुसार आरोपीचा सायबर सेलच्या पथकाने शोध घेऊन लुक्कास विल्यम (वय ३१, रा. हंडेवाडी, पुणे, मु.रा. नायजेरिया) याला अटक केली. मागील सहा वर्षापासून तो भारतात बेकायदेशीर पध्दतीने राहत आहे.
 

Web Title: Two members of ATM card cloning gang arrested from Nashik; There were 250 complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.