दौंडमध्ये युवतीला चाकूचा धाक दाखवत दोन लाख रुपये पळवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 18:02 IST2018-05-15T15:48:32+5:302018-05-15T18:02:37+5:30
मथुरा फायनान्सचा भरणा करण्यासाठी कॅनरा बँकेत दुचाकी वरुन जात असताना त्यांना गजानन महाराज मंदिराजवळ दोघा युवकांनी अडवत चोरी केली.

दौंडमध्ये युवतीला चाकूचा धाक दाखवत दोन लाख रुपये पळवले
दौंड: दौंड शहरातील मधुरा फायनान्समधील कर्मचारी योगिता आहेर (वय ३१ रा. सरपंचवस्ती, दौंड) यांना दोन अज्ञात युवकांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्या कडील बँकेत भरण्याचे एक लाख नव्वद हजार तसेच मोबाईल घेऊन पोबारा केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना सोमवारी घडली आहे. आहेर या मथुरा फायनान्सचा भरणा करण्यासाठी कॅनरा बँकेत दुचाकी वरुन जात असताना त्यांना गजानन महाराज मंदिराजवळ दोघा युवकांनी अडवले. या युवकांनी तोंड झाकले होते. यावेळी या दोघांनी सदर महिलेला चाकु दाखवून महिलेजवळील पैशांची पर्स पळवली. सदरचा प्रकार पाळत ठेऊन केला असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.